Tuesday, September 17, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : अतिक्रमण पथकाकडून झालेल्या मारहाणीचा फेरीवाल्यांनी केला निषेध

PCMC : अतिक्रमण पथकाकडून झालेल्या मारहाणीचा फेरीवाल्यांनी केला निषेध

भाजीविक्रेत्या महिलेस शहरातील फेरीवाल्यांचे समर्थन-येथे काशिनाथ नखाते PCMC

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाकडून व एमएसएफ जावानाकडून दापोडी येथे भाजीविक्रेत्या रेश्मा कांबळे यांना अमानुष मारहाण करण्यात आली, याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध करत त्यांचा व्यवसाय व त्यांची कायदेशीर लढाई लढण्यासाठी शहरातील सर्व फेरीवाल्यांचा समर्थन राहील असा विश्वास कामगार नेते काशिनाथ नखाते (Kashinath Nakhate) यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज घटनास्थळी जाऊन मारहाण झालेल्या महिलेची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली. pcmc

यावेळी कार्याध्यक्ष इरफान चौधरी,ज्ञानेश्वर शेळके, रॉबिन गजभिव, दीपक साळवे, संदेश बोर्डे, रवींद्र कांबळे, हनुमंत कसबे, जगन्नाथ काटे, ओमप्रकाश मोरया, अंबालाल सुखवाल, मनोज यादव,गौतम कांबळे, मुकेश सूर्यवंशी, दत्ता चौधरी, शिवाजी कांबळे, सिकंदर सूर्यवंशी, अर्चना कुटे आदी उपस्थित होते.

फेरीवाला कायद्याची अमलबजावणी न करता अत्यंत चुकीच्या पद्धतीने मारहाण करून फेरीवाला घटकाला संपवण्याचा प्रयत्न आयुक्त शेखर सिंह व अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे हे हडपशाही व दादागिरी पद्धतीने करत आहेत.

यामुळे गोरगरीब व सर्वसामान्य फेरीवाल्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. मोठमोठ्या प्लॉटवरील अतिक्रमण तसेच सरकारी जागेवरील अतिक्रमणाला आयुक्त व अतिरिक्त आयुक्त अभय देऊन त्यांच्यावर अजिबात कारवाई करीत नाहीत. मात्र गरिबांना, फेरिवल्यानां छळले जात आहे. वास्तविक कायद्याची अंमलबजावणी न करता अशा पद्धतीने कारवाई करून जर फेरीवाला हटाव मोहीम करण्यात येणार असेल तर त्याला तेवढाच प्रतिकार करण्यात येईल.

महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह हे शहरातील जनतेला वाऱ्यावर सोडून बिनधास्तपणे देशात आणि विदेशात पर्यटन करीत आहेत. शहरातील नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न, आरोग्य, असो की बेकायदेशीर होर्डिंगचा प्रश्न असो सर्व ठिकाणी प्रशासन अपयशी ठरले आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : देशात एँटी पेपर लीक कायदा लागू, मध्यरात्री अधिसूचना जारी, वाचा काय आहे कायदा !

NER : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत तब्बल 1104 जागांसाठी भरती

MPKV : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती

ब्रेकिंग : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती

युद्ध थांबवले पण पेपरफुटी थांबवता आली नाही… राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका

मोठी बातमी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन

सर्वात मोठी बातमी : पोलिस भरती संदर्भात सरकारचा मोठा निर्णय

आंतरराष्ट्रीय योग दिवस : प्राचीन ज्ञानाचा आधुनिक जगाला वारसा

BSF : सीमा सुरक्षा दलात 10वी/12वी उत्तीर्णांसाठी भरती; पगार 81000 पर्यंत

AVNL : आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड, ठाणे अंतर्गत विविध पदांची भरती

मोठी बातमी : वाराणसीत पंतप्रधान मोदींच्या कारवर चप्पल फेक ?

मोठी बातमी : हज यात्रेत 550 जणांचा उष्मघाताने मृत्यू !

संबंधित लेख

लोकप्रिय