अजमेरा, म्हाडा कॉर्नर शाखा स्थापन व मेळावा
पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर, (दि.०३) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून हॉकर झोनची पाहणी व जागा निश्चिती करण्याचे काम सुरू असून अनेक वर्ष रस्त्यावर विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना व्यवसायजन्य जागा देऊन सन्मानाने पुनर्वसन करण्यात यावे असे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले.
मोरवाडी म्हाडा कॉर्नर येथे नॅशनल हॉकर फेडरेशनच्या महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ नामफलकाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी मा.नगरसेवक तुषार हिंगे, मा.नगरसेवक समीर मासुळकर, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कापसे, मनपा सदस्य कविता खराडे, सामाजिक कार्यकर्ते सचिन नागणे, कार्याध्यक्ष राजू बिराजदार, बालाजी लोखंडे, ओमप्रकाश मोरया, शाखाध्यक्ष राजू पठाण, सलीम शेख, रुक्मिणी माशाळकर, रज्जाक शेख, विजय दिवटे, अनिल कांबळे, प्रल्हाद बागुल, संदीप खरात, जयश्री शिंदे, प्रमोद गवई आदी उपस्थित होते.
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2023/11/c4e68251-9db4-4101-b548-8b9500de27c7-1024x576.jpeg)
यावेळी नखाते म्हणाले की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सन २०१३ मध्ये जागांची पाहणी केली आणि पुढे काहीच काम झालं नाही आता त्याप्रमाणे आता तसे न करता महापालिका प्रशासनाने शहरातील विक्रेत्याला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून चांगल्या जागा निवडून त्या ठिकाणी त्यांचे योग्य ते पुनर्वसन करावे. काही जागा व्यवसायपूरक आहेत. अनेक जागा आम्ही सुचवत आहोत त्याही योग्य होणार आहेत.
तुषार हिंगे म्हणाले की, फेरीवाला हा गरीब वर्गातून येत असून व्यवसाय करताना त्यांना अनेक वेळा कारवाईला सामोरे जावे लागत आहे. महापालिकेने त्यांचे योग्य नियोजन केल्यास कारवाईची वेळ येणार नाही आता वेळ न घालवता त्यांचे नियोजन करण्यात यावे.
समीर मसुळकर यांनी जे उर्विपसून आहेत अशा विक्रेत्यांना प्राधान्य द्यावे आणि फेरीवाल्यांनी स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. प्रस्तावना राजू पठाण यांनी केली तर आभार किरण साडेकर यांनी मानले.