पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – आद्य क्रांतिवीर वस्ताद लहूजी साळवे यांची नात ज्ञानगंगा मुक्ता साळवे यांची जयंती साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पूर्णाकृती स्मारक निगडी या ठिकाणी साजरी करण्यात आली. (PCMC)
ज्येष्ठ नेते नानासाहेब कांबळे व भीमराव आडागळे यांच्या शुभहस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .
दरम्यान ज्ञानगंगा मुक्त साळवे सार्वजनिक ग्रंथालयाची घोषणा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे प्रबोधन पर्व अध्यक्ष तथा शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले व क्रांतिवीर विचार मंचाचे अविनाश शिंदे यांनी केली.
यावेळी क्रांतिवीर विचारमंचाचे अविनाश शिंदे, मातंग चेतना परिषद शहराध्यक्ष ज्येष्ठ नेते नानासाहेब कांबळे, आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्व अध्यक्ष बाबु पाटोळे, शिवशाही व्यापारी संघ पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शिवाजीराव खडसे यांनी ग्रंथालयाच्या निर्मितीसाठी प्रत्येकी पाचशे रुपये तसेच शिवशाही व्यापारी संघ वाहतूक आघाडी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष अनिल तांबे, भिमराव उर्फ दादासाहेब आडागळे यांनी शंभर रुपये मदत निधी शिवाजीराव खडसे यांच्याकडे जमा केली. तसेच ज्ञानगंगा मुक्ता साळवे सार्वजनिक ग्रंथालयाच्या निर्मिती प्रसंगी कौतुक आनंद व्यक्त केला. (PCMC)
यावेळी ज्येष्ठ नेते नानासाहेब कांबळे, भीमराव उर्फ दादासाहेब आडागळे, क्रांतिवीर विचार मंचाचे अविनाश शिंदे आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे जयंती महोत्सवाचे अध्यक्ष बाबू पाटोळे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती अध्यक्ष तथा शिवशाही व्यापारी संघ संस्थापक / अध्यक्ष युवराज दाखले, वरिष्ठ उपाध्यक्ष माणिकराव पोळ, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शिवाजीराव खडसे, शिवशाही वाहतूक आघाडी शहराध्यक्ष अनिल तांबे, प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डाखोरे, पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश कळवले,खेड तालुका अध्यक्ष अजय कसबे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्व अध्यक्ष नितीन घोलप,लहुजी शक्ती सेना युवक आघाडी अध्यक्ष अक्षय पोळ, गणेश ताटे, सौरभ खंडागळे, ऋषिकेश वाघमारे, विक्रम गायकवाड, आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.