Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : पावसाळ्यात फूटपाथची कामे, झाडांची विल्हेवाट, प्रशासनाची मूक संमती असल्याचा आरोप

PCMC : पावसाळ्यात फूटपाथची कामे, झाडांची विल्हेवाट, प्रशासनाची मूक संमती असल्याचा आरोप

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : छत्रपती संभाजी महाराज प्रवेशद्वार तापकीर नगर, काळेवाडी याठिकाणी मुसळधार पावसात फुटपाथ दुरुस्तीची कामे सुरू आहेत. येथील देखभाल दुरुस्तीची कामे व्हि एम मातरे कंपनीला देण्यात आली आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत पिंपरी चिंचवड शहरात विविध ठिकाणी अशी कामे मोठ्या प्रमाणात चालू आहेत.



यामध्ये नागरीकांच्या कर रूपी लाखों रूपयांची उधळपट्टी प्रशासनाला हाताशी धरून चालू आहे. प्रामुख्याने राहटणी काळेवाडी परिसरातील छत्रपती संभाजी महाराज प्रवेशद्वार तापकीर नगर या ठिकाणी भर पावसात सिमेंट काँक्रीटचे काम करून झाडांची असंख्य मुळे तोडण्याचे काम व्हि एम मातरे कंपनीचे सुपरवायजर व कामगार करित आहेत, ही अत्यंत गंभीर बाब आहे.



आम्ही स्वतः पाणी घालून झाडे मोठी केली आहेत, परंतु मातरे कंपनीचे कामगार कोणतीच काळजी घेताना दिसत नाहीत. तसेच अतिशय निकृष्ट दर्जाचे काम करीत आहेत, देखभाल दुरुस्तीची कामे पावसात केल्याने ती निकृष्ठ दर्जाची होतात, अशी कामे करताना झाडांची काळजी घेतली जात नाही, त्यामुळे सदर ठेकेदार कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी लोकसेवक युवराज दाखले यांनी आयुक्त शेखर सिंह यांचेकडे केली आहे.


संबंधित लेख

लोकप्रिय