पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी’च्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहामध्ये तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवाचे (pcmc) आयोजन करण्यात आले असून काल महोत्सवाच्या दुसरया दिवशी शास्त्रीय गायन, सतार-व्हायोलिन जुगलबंदी तसेच कथ्थक नृत्याने उपस्थित रसिक प्रेक्षक भारावून गेले.
महापालिकेच्या संगीत अकादमीच्या विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाने या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची दमदार सुरुवात झाली. या विद्यार्थ्यांनी शास्रीय गायन, तबला वादन आणि हार्मोनियम वादनाने उपस्थितांची मने जिंकली. pcmc
प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या कडकडाटाने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. त्यानंतर पंडित सुधाकर चव्हाण यांनी आपल्या शास्त्रीय गायनातून राग बिहाग सादर केला. त्यांचे गायन रसिकांच्या मनाला भिडले. त्यांनतर उस्ताद शाकीर खान आणि तेजस उपाध्ये यांच्यातील सतार आणि व्हायोलिनच्या जुगलबंदीचा अनोखा आविष्कार पाहायला मिळाला. या दमदार जुगलबंदीने रंगलेली एक सुरेल संध्याकाळ रसिकांनी अनुभवली.
पंडित श्रीनिवास जोशी आणि त्यांचे सुपुत्र विराज जोशी यांच्या यांनी त्यांच्या शास्त्रीय गायनातून मालकंस राग सादर केला.
‘मदनाचा पुतळा राजस सुकुमार……….’ या अभंगाने रसिक मंत्रमुग्ध झाले. त्याच्या सुरेल गायनामुळे मैफिल उत्तरोत्तर रंगत गेली. पंडित दीपक महाराज यांच्या अप्रतिम कथ्थक नृत्याने या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा समारोप झाला.
विश्वजित लोंढे, निखील वाघमारे, संतोष साळवे, समीर सूर्यवंशी यांनी तबल्याला समर्पक साथ दिली. हरिदास सावंत, उमेश पुरोहित, अजरुद्दीन शेख यांनी हार्मोनियमला साथसंगत केली. तसेच बासरीच्या माध्यमातून गायकांना जयवर्धन दधीच यांनी उत्तम साथ दिली. pcmc news
या कार्यक्रमास महापालिकेचे सहाय्यक आयुक्त पंकज पाटील, क्रीडा अधिकारी अनिता केदारी, समन्वयक समीर सुर्यवंशी, क्रिडा पर्यवेक्षक अरूण कडूस संगीत शिक्षक उमेश पुरोहित, स्मिता देशमुख, विनोद सुतार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंगेश वाघमारे यांनी केले.
हेही वाचा :
ब्रेकिंग : केंद्रीय मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर, वाचा कुणाला मिळाले कोणते खाते ?
मोठी बातमी : शाळकरी मुलांसाठी ‘एक राज्य एक गणवेश’ योजना लागू होणार
Manipur : अस्वस्थ मणिपूर, शांत करा, संघाचा (RSS) केंद्र सरकारला इशारा?
Air Force : इंडियन एअर फोर्स कॉमन एडमिशन टेस्टमध्ये 304 पदांसाठी भरती
मोठी बातमी : डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांच्यावर हल्ला
ब्रेकिंग : ममता बॅनर्जी यांचा मोठा दावा काही दिवसांत इंडिया आघाडीचे सरकार
मोठी बातमी : इंडिया आघाडीकडून नितिश कुमार यांना पंतप्रधान पदाची ऑफर
ब्रेकिंग : शिंदे गटाच्या नेत्यांचा खळबळजनक दावा, ठाकरे गटाचे दोन खासदार संपर्कात
ब्रेकिंग : रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे निधन
ICF : 10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांसाठी इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये 680 जागांसाठी भरती
मोठी बातमी : राज्यात अतिवृष्टीचा इशारा ; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा