Friday, December 27, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : मिळकतकर सवलत योजनेला मुदतवाढ द्या : आमदार महेश लांडगे

PCMC : मिळकतकर सवलत योजनेला मुदतवाढ द्या : आमदार महेश लांडगे

महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन PCMC

पिंपरी-चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पिंपरी-चिंचवड महापालिका (PCMC)हद्दीतील मिळकतधारकांना मालमत्ता कर भरण्यासाठी सवलत योजनेला किमान महिनाभर मुदतवाढ द्यावी. तसेच, अधिकाधिक मिळकतधारकांना कर भरण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी भाजपा आमदार महेश लांडगे (Mahesh Landage) यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिका कर संकलन विभागाकडून मिळकतकर वसुली मोहीम सक्षमपणे राबवली जात आहे. शहरातील मिळकतधारकांनी नियोजित वेळेत कर भरणा करावा आणि त्यांना सवलत मिळावी. या करिता विविध योजना सुरू केल्या आहेत. pcmc

महापालिकेच्या विविध कर सवलतींचा लाभ घेण्यासाठी मालमत्ता धारकांची कर संकलन कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. कर आकारणी व कर संकलन विभागाने 2024-25 या आर्थिक वर्षातील पावणेदोन महिन्यातच अडीचशे कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे.

दि. ३१ मे पर्यंत मिळकतकर भरणा करणाऱ्यांना सुमारे ५ टक्के आणि ऑनलाईन व रोख स्वरुपात कर भरणार कारणाऱ्या मालमत्ताधारकांना ५ ते २० टक्क्यांपर्यंत विविध कर सवलती देण्यात येत आहेत. त्यामुळे आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच कर भरण्यास अनेक मालमत्ताधारक प्राधान्य देतात.

सध्या मे महिन्याच्या शाळेच्या सुट्टया आणि लोकसभा निवडणुकांच्या कामकाजामुळे प्रशासकीय यंत्रणेवर ताण होता, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे. pcmc news

महापालिकेच्या वतीने कर संकलनासाठी 17 झोन आहेत. तसेच ऑनलाईनही सुविधा उपलब्ध आहे. मात्र, अनेक नागरिक रोखीने कर भरत आहेत. शाळांना सुट्टया असल्यामुळे अनेक मिळकतधारकांनी कर भरणा केलेला नाही. ३१ मे हा सलवतीचा शेवटचा दिवस असल्यामुळे कर सवलत योजनेपासून अनेक मिळकतधारक वंचित राहणार आहेत. त्यामुळे या योजनेला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली आहे. pcmc news

प्रतिक्रिया :

मिळकत कर भरणा सवलत योजनेला पिंपरी-चिंचवडकर चांगला प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे विक्रमी मिळकतकर वसुली होते. दि. ३१ मेनंतर नागरिकांना सवलत मिळणार नाही. त्यामुळे शेवटच्या दोन दिवसांमध्ये कर संकलन केंद्रावर गर्दी होते. अनेक मिळकतधारकांना अद्याप बीले मिळालेली नाहीत, तसेच, ऑनलाईन कर भरणा करण्यासाठी तांत्रिक अडचणी येतात, अशाही तक्रारी आहेत. त्यामुळे मालमत्ता कर सूट योजनेला किमान महिनाभर मुदतवाढ द्यावी, आणि अधिकाधिक मालमत्ताधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.

महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची संधी

संतापजनक : मनुस्मृतीचे दहन करायला गेले बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र फाडले

धक्कादायक : कुऱ्हाडीने आई-वडील, पत्नीसह ८ जणांची हत्या करून आत्महत्या

पुणे अपघात प्रकरण : बिर्याणीचा आस्वाद घेत समितीकडून चौकशी, संताप व्यक्त

अन् राहुल गांधी यांनी अचानक ओतले डोक्यावर पाणी, व्हिडिओ व्हायरल

जितेंद्र आव्हाड आज महाड येथे करणार मनुस्मृतीचे दहन, वाचा काय आहे प्रकरण !

ब्रेकिंग : पालघरमध्ये रेल्वेचा भीषण अपघात ; डझनभर गाड्या रद्द, रेल्वेकडून हेल्पलाइन क्रमांक जारी

मोठी बातमी : बाबा गुरमीत राम रहीमची हत्याकांड प्रकरणातून निर्दोष मुक्तता

ब्रेकिंग : अजित पवार यांना मोठा धक्का, ‘या’ प्रकरणात होणार चौकशी

लोकसभेच्या निकाला अगोदरच राज ठाकरेंनी भाजपाला दिला मोठा धक्का

मोठी बातमी : ICICI आणि YES बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई

माझ्या भुकेल्या पोटासाठी मी नोकरीच्या शोधात, उर्फी जावेदची पोस्ट व्हायरल !

ब्रेकिंग : लोकसभेत काय होईल ब्रम्हदेवही सांगू शकत नाही अजित पवार यांचे मोठे विधान

NDA : एनडीए प्रवेशासाठी सीईटी; अर्ज करण्यासाठी काहीच दिवस बाकी!

छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन

ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांच्या विविध प्रश्नांसाठी मुंबई परिवहन आयुक्त येथे बैठक

संबंधित लेख

लोकप्रिय