Friday, December 27, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : अनधिकृत फळविक्री व्यावसायिकांचे अतिक्रमण

PCMC : अनधिकृत फळविक्री व्यावसायिकांचे अतिक्रमण

पिंपरी चिंचवड : शहरातील विविध रस्त्यावर भाजीपाला, फळ विक्रेते अनधिकृतपणे विक्री करत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे वाहतूक सुरक्षेवर त्यांचा परिणाम होत आहे. रस्त्यावर टेम्पोतून फळ, भाजी विक्री करत असल्याने अनेक नागरिक रस्त्यावरच थांबून खरेदी करतात. त्यामुळे ग्राहकांची गर्दी होते आणि वाहनचालकांना अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी होते. यामुळे येथील वाहन चालक आणि त्रस्त नागरिकांकडून कारवाईची मागणी होत आहे. (PCMC)

के एस बी चौक, चिंचवड कडून थरमॅक्स चौकाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर अनधिकृतपणे फळांची विक्री केली जात आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फळ विक्रेते टेम्पोच्या पन्नास मीटर अंतर अलीकडेच फळे आणि त्याचे दर सांगून सांगतात. त्यामुळे अनेक नागरिक आपली वाहने रस्त्यातच उभी करून फळे खरेदी करतात. कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता हा व्यवसाय भर रस्त्यावर सुरु असतो. मात्र, महापालिकेकडून याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.

रस्त्यावर टेम्पोतून फळ विक्री करणाऱ्यांमुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे नक्कीच अपघाताची शक्यता निर्माण होऊ शकते. महापालिकेने यावर लवकरात लवकर कारवाई करावी. अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. (PCMC)

रस्त्यावर अनधिकृत पथारी व्यावसायिकांचे प्रमाण प्रचंड वाढले असून, अनेक ठिकाणी पोट भाडेकरू ठेवल्याचे निदर्शनास येत आहे. महापालिकेने नव्याने सर्वेक्षण करून अधिकृत पथारी व्यावसायिकांसाठी जागोजागी हॉकर्स झोन निर्माण करून सर्व रस्ते नागरिकांसाठी खुले करण्यात यावे.

शिवानंद चौगुले (सामाजिक कार्यकर्ते)

संबंधित लेख

लोकप्रिय