Home पुणे - पिंपरी चिंचवड PCMC : “दिव्यांग” मुले रमले निसर्गाच्या सानिध्यात

PCMC : “दिव्यांग” मुले रमले निसर्गाच्या सानिध्यात

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – “अभिराज फाउंडेशन” वाकड येथील दिव्यांग मुलाच्या शाळा व कार्यशाळेतील एकूण ३८ विद्यार्थी व शिक्षक, सेवा स्वरूप फाउंडेशनच्या भूकंप खाटपेवाडी येथील “मधुरांगण” प्रकल्पामध्ये दि. १ व २ फेब्रुवारी२०२५ मुक्कामी गेले होते. (PCMC)

या वेळी मधुरांगणचे कार्यवाह, व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांनी काटेवाडी भुकूम येथील डोंगर चढून आनंद व्यक्त केला.

प्रकल्प स्थळी मनोरंजनात्मक खेळ खेळून सहलीचा आनंद घेतला. यावेळी प्रकल्पातील कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना स्वादिष्ट भोजन दिले. (PCMC)

विद्यार्थ्यांनी एक दिवस स्वतःच्या पालकांपासून दूर राहून निसर्गाच्या मनमुरात असा आनंद घेतला. या सहलीसाठी अभिराज फाउंडेशनचे सर्व शिक्षक, सेवक व अभिराज पालक संघाचे सल्लागार धनंजय बालवडकर यांनी परिश्रम घेऊन ही सहल यशस्वी केली.

Exit mobile version