Saturday, April 5, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ इमारतीची दुरावस्था

इमारतीच्या आवारात घाणीचे साम्राज्य

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर
: संभाजीनगर,चिंचवड येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयाची बाहेरून इमारत चांगली दिसते, पण आतून मात्र बेभरावशावर टिकून असलेला नजरेस पडतो. या कार्यालयातील कागदपत्रेही ठेवण्यासाठी सुसज्ज व्यवस्था नाही. सर्व काही आलबेल असल्याचा प्रत्यय येतो. या खात्याचे वरिष्ठ अधिकारी याठिकाणी कधी येतात की नाही, हाही प्रश्‍न या इमारतीची अवस्था पाहिल्यानंतर उपस्थित होतो.

---Advertisement---



या इमारतीच्या तळमजल्यात पार्किंग साठी व्यवस्था आहे. पावसाळ्यात या जागेत पाणी साचत आहे. या साचलेल्‍या पाण्यामुळे दुर्गंधी येत असून डास तसेच कीटकांची उत्‍पत्तीदेखील होत आहे. इमारतीच्या आवारात सुद्धा घाणीचे साम्राज्य असून अग्निशामक यंत्रणा सुद्धा दुरावस्थेत असल्याचे आढळून आले. त्‍यामुळे रहिवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या साचलेल्या पाण्यात डासांचे उत्पादन होत असल्‍याने त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे.



इमारती आवारात पावसाचे पाणी साचल्याने रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. साचलेल्या पाण्यात डास, कीटकांची उत्पत्ती होत असून रोगराई पसरण्याची भीती व्‍यक्‍त करण्यात येत आहे.‍मात्र महापालिकेकडून सुद्धा दुर्लक्ष होत असल्याने सामाजिक कार्यकर्ते संदीप थोरात यांनी निषेध व्‍यक्‍त केला. सदर ठिकाणी लोककल्याणकारी योजना या खात्यातर्फे वापरल्या जातात. त्याच कामगार कल्याण खात्यात योजनांसाठी येणाऱ्यांची संख्या काही कमी नाही.कामगार कल्याण विभागाने तातडीने साचलेल्या पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी, अशी मागणी शिवानंद चौगुले यांनी केली आहे.

---Advertisement---

हे ही वाचा :

धक्कादायक : मणिपूर हिंसाचारात स्वातंत्र्यसैनिकाच्या 80 वर्षीय पत्नीला जमावाने जिवंत जाळले

पत्नीसह पुतण्याची गोळी झाडून हत्या केल्यानंतर पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या

धक्कादायक : गेल्या सहा महिन्यांत तब्बल 87 हजार लोकांनी सोडले भारताचे नागरिकत्व

अक्षय कुमार आणि आलिया भारतात राहु शकतात तर मी का राहु शकत नाही, सीमा हैदरची राष्ट्रपतींकडे दया याचिका

विदर्भ : नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून, स्थलांतरित नागरिकांना सर्व सुविधा पुरवा !

विशेष लेख : इर्शाळवाडी सारख्‍या दुर्घघटनांना मानवी हस्‍तक्षेपही कारणीभूत

सुवर्णसंधी ! सरकारी रुग्णालयात 14,000 पदभरती !

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles