राष्ट्रवादी मध्यवर्ती कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त अभिवादन (PCMC)
पिंपरी चिंचवड – (क्रांतीकुमार कडुलकर) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्यवर्ती कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे “शिवजयंती” निमित्त शहराध्यक्ष श्री. योगेश मंगलसेन बहल यांच्या मार्गदर्शनात शहरातील प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते “श्री. छत्रपती शिवाजी महाराज” यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. (PCMC)
शहराध्यक्ष योगेश बहल आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या शौर्याचे प्रतीक आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक नाव नसून शौर्य, समता, प्रेरणा आणि आस्थेचे केंद्र आहे. त्यांचे शौर्य आणि कधीही पराभव न स्वीकारण्याची जिद्द, आजही लोकांना प्रेरित करते. वीर शिवाजी महाराज त्याची चिकाटी, शौर्य आणि वर्चस्व हे त्याच्या नंतर येणाऱ्या सर्वांसाठी एक उदाहरण आहेत.
त्याच्या धाडसाला मर्यादा नव्हती. ते एक योद्धा, असून युग पुरूष होते, महराज ‘गनिमी युद्धाचे जनक’ आहेत, त्यांच्या १६ व्या शतकातील गनिमी, घोडदल, पायदल, नौदल युध्दांचा आदर्श घेत लष्करी पराक्रमाने, नाविन्यपूर्ण गनिमी युद्धाच्या रणनीतींनी जगातील आतापर्यंतच्या सर्वात महान योद्ध्यांपैकी एक आणि रणनीतीकार म्हणून त्यांचा वारसा मजबूत केला. युद्धकलेत त्यांच्या प्रतिभेमुळे त्यांना प्रचंड संख्यात्मक श्रेष्ठता असूनही, शक्तिशाली मुघल साम्राज्य आणि विजापूर सल्तनत यासारख्या भयानक शत्रूंवर त्यांनी विजय मिळवला.
ज्यांनी लोकांच्या कल्याणासाठी सर्व समावेशक अष्टप्रधान मंत्रीमंडळ स्थापन करून अन्यायाविरुद्ध लढा दिला आणि आपल्या शौर्याने मुगलांना सळो की पळो ची वेळ शत्रूंवर आणून त्यांना धूळ चारण्यास ते यशस्वी ठरले. आज आपण फक्त त्यांच्या शौर्याचा सलाम करू शकतो, परंतु त्यांच्या शौर्याची, धैर्याची आणि संघर्षाची शिकवण आपल्या जीवनात उतरवली पाहिजे. त्यांच्या शिकवणींचे अनुसरण करूनच आपण खऱ्या अर्थाने स्वराज्याची, स्वाभिमानाची आणि भारतीयतेच्या मूलतत्त्वांची महती पेलू शकतो. त्यांचा स्वाभिमान, कार्यकुशलता, आणि नीतिमत्ता हेच आपल्या समाजासाठी आवश्यक आहे. चला, आजच्या दिवशी आपण ठरवूया की, आम्ही शिवाजी महाराजांच्या विचारांप्रमाणे जगायचं आणि त्यांचं आदर्शावर आपले जीवन बनवायचं. (PCMC)
तसेच प्रदेश सरचिटणीस ॲड.गोरक्ष लोखंडे बोलताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांना एक शूर योद्धा, नवीन लष्करी रणनीती वापरणारे चतुर रणनीतीकार आणि एक कुशल प्रशासक म्हणून ओळखले जाते. त्यांनी आदर्श हिंदूचे वैशिष्ट्य असलेल्या अटल गुणांना केवळ आत्मसात केले नाही तर या दोन महाकाव्यांमधील शिकवणींचे त्यांच्या जीवनात पालन देखील केले. त्यांनी आयुष्यात कधीही कोणाकडूनही पराभव स्वीकारला नाही.
आज आपल्याला फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची नावे घेऊन चालणार नाही तर त्यांच्या विचारांवर चालायला हवे, त्यांचे तत्त्वज्ञान अंगी कारायला हवे.
यावेळी युवक अध्यक्ष शेखर काटे, विद्यार्थी अध्यक्ष चेतन दुधाळ, माजी उप महापौर मोहंम्मद पानसरे, जगन्नाथ साबळे, माजी नगरसेवक प्रकाश सोमवंशी, सतीश दरेकर, काळुराम पवार, राजू बनसोडे, राजू लोखंडे माजी नगरसेविका शमीम पठाण, अमिना पानसरे, मा.सभापती मायला खत्री, प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, ओबीसी प्रदेश कार्याध्यक्ष ॲड.सचिन आवटे, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष संजय औसरमल, उद्योग व व्यापार सेल अध्यक्ष श्रीकांत कदम, बाबुराव शितोळे, असंघटीत कामगार सेल अध्यक्ष रवींद्र ओव्हाळ, ख्रिश्चन सेल अध्यक्ष डॅनियल दळवी, अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष युसुफ कुरेशी, सेवादल सेल अध्यक्ष महेश झपके, पदवीधर सेल अध्यक्ष प्रदीप आवटे, अर्बन सेल महिला अध्यक्ष मनिषा गटकळ, महिला वरिष्ठ कार्याध्यक्ष कविता खराडे, कार्याध्यक्षा उज्वला ढोरे, अकबर मुल्ला, दीपक साकोरे, भोसरी विधानसभा अध्यक्ष ज्योती गोफणे, शिक्षक सेल अध्यक्ष पवन खराडे, व्हीजेएनटी सेल महिला अध्यक्ष निर्मला माने, आशाताई शिंदे, उपाध्यक्ष शिरीष साठे, गोरोबा गुजर, प्रदीप गायकवाड, राजू चांदणे, संपतराव पाचुंदकर, ज्ञानेश्वर उर्फ माऊली मोरे, प्रवीण गव्हाणे, विनय शिंदे, बापू कातळे, चंद्रम हलगी, ॲड. किशोर गुरव, रामकिसन माने, उपाध्यक्ष तुकाराम बजबळकर, कुमार कांबळे, यश बोध, सरचिटणीस बाळासाहेब चौधरी, रमजान सय्यद, अभिजीत आल्हाट, नीलम कदम, सपना कदम, मीरा कदम, गोरोबा गुजर, महेश माने, रशीद सय्यद, शहाजी अत्तार, सचिन वाल्हेकर, प्रशांत महाजन, जियाउद्दीन नागुर, समर्थ जगताप, प्रशांत म्हसे, निखिल सिंह, कार्यालयीन संपर्क प्रमुख धनाजी तांबे, सुनिल अडागळे, गणेश हरजुळे इत्यादींसह मान्यवरांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
PCMC : छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या शौर्याचे प्रतीक – योगेश बहल
- Advertisement -