पराभवाच्या भीतीने कोल्हापूर सोडून कोथरूड मतदार संघात यावे लागले आहे – काशिनाथ नखाते
पिंपरी चिंचवड /क्रांतीकुमार कडुलकर : जिथे राजर्षी शाहूंचा लढण्याचा वारसा असलेल्या कोल्हापूरतील कोणत्याही मतदारसंघांमध्ये पराभव होईल, याची भीती असल्याने कोथरूड मधल्या महिला आमदाराचे तिकीट कापून अन्याय करून चंद्रकांत पाटील पुण्यात निवडणूक लढावी लागली होती. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांचे बाबत विधान करताना आत्म परीक्षण करावे, अशी टीका राष्ट्रवादी असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी केली. (PCMC)
बारामती येथे चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांचा पराभव हेच आमचे अंतिम ध्येय असून बारामती विजय प्राप्त करण्यासाठी त्यांनी आटापिटा सुरू आहे, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केल्याच्या पार्श्वभूमीवर नखाते यांनी टीका केली आहे.
मंत्रीपद दोन वेळा मिळूनही काही जनहिताचे निर्णय न घेणारे पाटील यांनी आत्मपरीक्षण करावे.
दोन वेळा मंत्रिपद मिळूनही लोकाभिमुख काही काम केले नाही.
प्रसिध्दी पत्रकात काशिनाथ नखाते यांनी म्हंटले आहे की, देशाचे नेते शरदचंद्र पवार विधानसभेचे ६ वेळा सदस्य राहिलेले आहेत, मुख्यमंत्री ४ वेळा, केंद्रीय मंत्री ४ वेळा राज्यसभा सदस्य २ वेळा राहिले आहेत आणि लोकप्रिय, लोकहिताचे, बहुजनांचे असंख्य निर्णय घेतलेले आहेत.दोन वेळा मंत्रिपद मिळूनही कोणतेही लोकाभिमुख निर्णय न घेणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी अभ्यास करून यांनी विधाने करावीत, असा सल्ला नखाते यांनी दिला आहे. (PCMC)
हे ही वाचा :
ब्रेकिंग : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात महत्वाची घडामोड
बाबा रामदेव यांना झटका; सर्वोच्च न्यायालयाची अवमान नोटीस
Police Bharti : पोलीस भरती प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता !
Pune : कांद्याच्या दरात घसरण; शेतकरी हवालदिल
मोठी बातमी : सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँकेला पुन्हा धरले धारेवर
अजमेर मध्ये रेल्वेचा भीषण अपघात, ४ डबे रुळावरून घसरले रुळही उखडले