Saturday, September 7, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : प्रशासनाने चिखली घरकुल वसाहतीला बोटिंग, स्विमिंग / सांडपाण्याचे पर्यटन स्थळ...

PCMC : प्रशासनाने चिखली घरकुल वसाहतीला बोटिंग, स्विमिंग / सांडपाण्याचे पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले – अभिनव आंदोलन (video)

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : मुसळधार पावसाने दरवर्षीप्रमाणे घरकुल मध्ये यावर्षी चिखली येठी घरकुल वसाहत तुंबलेल्या मैला मिश्रित सांडपाण्याने तुंबली. हजारो नागरिक घरात अडकून पडले, कमरे एवढ्या घाण पाण्यात २५ इमारती गेल्या, पिण्याच्या पाण्याच्या टाक्यात मैलामिष्रीत पाणी गेले, हजार बाराशे लोकांची नुकसान लिफ्टची नुकसान,आरोग्य समस्या ई नुकसान भरपाई प्रशासन देणार काय? असा सवाल करत आणि त्यांनी एक अनोखे आंदोलन केले प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या डोळ्यात अंजन घालण्याकरिता घरकुल मध्ये एक अनोखे आंदोलन केले. (PCMC)

घरकुलकरांनी ज्येष्ठ नागरिकांचे हस्ते या मैला मिश्रित तुंबलेल्या घाण पाण्याच्या नदी समोर नारळ फोडून आज घरकुलला बोटिंग, धबधबा, आणि स्विमिंग साठी घाण पाण्याचे पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आणि किमान येथून जमा होणाऱ्या वर्गणीतून प्रशासनाने हा प्रश्न कायमचा मार्गी लावावा अन्यथा उपोषण करून एक मोठे आंदोलन केले जाईल,असा इशारा प्रशासनास दिला आहे.


प्रशासनाने घरकुल घाण पाण्याचे पर्यटन स्थळ केले आहे.

याबाबत आम्ही घरकुलकरचे संस्थापक विकासराजे केदारी म्हणाले की, आम्ही कंटाळून आंदोलन करत आहोत, आमच्या विकासासाठी पैसा नाही, साधी पुरेशी सांडपाणी व्यवस्थापन करणे का जमत नाही, इथे नागरी सुविधांचे व्यवस्थापन करण्यात मनपा प्रशासन, सत्ताधारी, विरोधी राजकीय मंडळी अपयशी ठरली आहेत.

ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत,त्यामुळे आम्ही व्यथित आहोत. येथे आरोग्य समस्या निर्माण झाली आहे, तुंबलेल्या पाण्यामुळे झालेली नुकसान भरपाई देणार का? आम्ही काय करू शकतो. मैला मिश्रित कमरे एव्हढ्या पाण्यातून लोकांना जावे कसे हे कळत नाही, आम्ही सारे आर्थिक दुर्बल (EWS) घटकातील नागरिक आहोत, शहरात इतर ठिकाणी पावसाचे पाणी पण आमच्याकडे सांडपाण्याचा महापूर! (PCMC)

एक जेष्ठ नागरिक म्हणाले की, दहा वर्षे सत्ता असूनही आमची व्होटिंग बँक म्हणून वापर केला.
इथे सध्या सुमारे ३० / ४० हजार गरीब नागरिक राहतात, मनपा टॅक्स घेते, तीन वर्षे प्रशासकीय राजवटीत काहीतरी नागरी व्यवस्थापन होईल अधिकारी काम करतील, अशी अपेक्षा होती. पण काही सुविधा मिळाल्या नाहीत.

विकास आराखड्या नुसार(DP PLAN 2008) प्रमाणे नियोजन नाही.

येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक मगर म्हणाले की, येथे दहा वर्षापूर्वी पाईप पाईप लाईन टाकली होती ती छोटी आहे. दहा वर्षात एकदाही स्थापत्य अभियांत्रिकी निर्देशानुसार सांडपाणी निचरा होईल, अशी व्यवस्था केली नाही. मूळात घरकुल योजना सखल भागात झालेली आहे, याची माहिती प्रशासनाला आहे. स्पाईन रोड, शाहूनगर, पूर्णानगर आणि इतर वसाहती मधील सांडपाणी संभाजीनगर येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून (STP PLANT) घरकुल वसाहतीत शिरते.

सन 2008 सालाच्या प्लॅन प्रमाणे सांडपाणी निचरा पाईप लाईन मोठ्या व्यासाची उभारण्याकडे कोणीही लक्ष देत नाही, त्यामुळे संपूर्ण घरकुल वसाहत दरवर्षी मैला मिश्रित पाण्याने तुडुंब भरते. घरकुल मधील टॅक्स माफी घोषणा झाल्या.अनेक स्वप्ने दाखवली, जाहिराती केल्या. शाळा, उद्याने, भाजी मंडई ई अनेक गरजा येथील लोकांच्या आहेत. या विविध नागरी समस्यांकडे राज्यसरकारने आता लक्ष द्यावे, अशी आमची अपेक्षा आहे. (PCMC)

सत्ताधारी आणि विरोधी पक्ष घरकुल करांची उपेक्षा करतात.

भारत सरकारने (JNNURM / PMAY) सारख्या गोरगरिबांसाठी चांगली घरे उपलब्ध करून दिली आहेत, मात्र येथील नागरी समस्या निवारण आणि इतर गरजांसाठी मनपा, राज्यसरकारने लक्ष दिले पाहिजे, असे प्रधान मंत्री आवास योजनेमध्ये प्रमुख उद्देश आहे. भारत सरकार आणि पंतप्रधान यांच्या उद्दात्त हेतू येथील राजकीय मंडळींना समजलेला नाही. त्यामुळे आमची अशी दुरावस्था झाली आहे.

आम्ही पिंपरी चिंचवड मनपा प्रशासन आणि राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बारमाही समस्या असलेली घरकुल नागरी सुविधा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र आयुक्त दर्जाचा अधिकारी नेमा, अशी मागणी या लक्षवेधी आंदोलनाद्वारे करत आहोत, असे विकासराजे केदारी आणि अशोक मगर यांनी यांनी सांगितले. (PCMC)

या अभिनव आंदोलनात आम्ही घरकुलकर संस्थापक विकासराजे केदारी, अशोक मगर, तसेच पोलीस मित्र संघटनेचे अशोक तनपुरे, विजय अब्बाड, कुणाल बडीगरे, लक्षण देसाई, आम्ही घरकुलकर युवा सेनेचे प्रवीण बहिर, संदिप मंटगीकर,वसंत आलोणे, भगवान पारे, चैतन्य चव्हाण, दीपक कुंभार,विकास भळगट, संभाजी गोरे, किसन शेवते, विजय शिंदे, शारदा मुंगसकर, सुरेखा लोहार, रसवंती म्हस्के, प्रतिभा केदारी, उदय बागुल आदी सर्व बी लाईन युवा मंडळी आणि घरकुलकर सभासद बंधू भगिनी व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय