Sunday, May 19, 2024
Homeताज्या बातम्याPCMC:'आप' हा मोदीजी किंवा त्यांच्या केंद्रीय एजन्सीला घाबरणारा पक्ष नाही-चेतन बेंद्रे

PCMC:’आप’ हा मोदीजी किंवा त्यांच्या केंद्रीय एजन्सीला घाबरणारा पक्ष नाही-चेतन बेंद्रे

अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यासाठी एक महा-षडयंत्र सुरू आहे

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:दि.२३-आप व काँग्रेसमध्ये इंडिया आघाडीत जागावाटपाची चर्चा यशस्वीपणे पूर्ण केल्याची बातमी समोर येताच,भाजपने सीबीआयच्या माध्यमातून अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यासाठी एक महा-षडयंत्र आखत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून,आम्ही ऐकत आहोत की आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांच्यातील इंडिया आघाडीची चर्चा यशस्वी निष्कर्षापर्यंत पोहोचत आहे.बहुतेक राज्यांमध्ये जागा वाटपाची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल,अशी अपेक्षा आहे.गेल्या काही महिन्यांपासून ही चर्चा यशस्वी होईल की नाही हे स्पष्ट नसताना भाजपमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र जागावाटपाची ही बातमी समोर येताच भाजपमध्ये भूकंप झाला आहे.आता भाजपने युती तोडण्यासाठी महा-षडयंत्र आखले आहे,असा आरोप आम आदमी पार्टीचे पदवीधर आघाडी राज्य प्रदेशाध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.

कालपासून ‘आप’च्या वरिष्ठ नेत्यांना अनेक लोकांकडून संदेश मिळत आहेत की, ‘आप’ने इंडिया आघाडी सोडली नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी सीबीआयच्या माध्यमातून ‘अरविंद केजरीवाल’ यांना अटक करतील.असा प्रचार केला जात आहे.
आपल्या सर्वांना माहीत आहे की, गेल्या दोन वर्षांपासून मोदीजींनी तथाकथित दिल्ली दारू घोटाळ्याच्या चौकशीसाठी ईडी आणि सीबीआयला कामाला लावले आहे. गेल्या दोन वर्षात 1000 हून अधिक छापे टाकण्यात आले आहेत, ईडी ने 7 समन्स पाठवले आहेत, सीबीआय ने अनेक नोटिसा पाठवल्या आहेत, केजरीवाल यांची ची सीबीआय कडून 9 तास चौकशी करण्यात आली आहे, पण सीबीआय आणि ईडी दोघांनाही एक पैसा किंवा ठोस पुरावा असे काही सापडले नाही.

भाजपला लोकसभा निवडणुकीत पराभव होण्याची भीती वाटत आहे.

आता इंडिया फ्रंट /आघाडीची चर्चा पूर्ण होत असताना, मोदीजींना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव होण्याची भीती वाटत आहे.आम्हाला जे सांगण्यात आले आहे ते असे आहे की लवकरच – 1 किंवा 2 दिवसांत – सीबीआय CrPC च्या कलम 41A अंतर्गत नोटीस जारी करणार आहे आणि त्यानंतर लवकरच, आणखी 1 किंवा 2 दिवसांत – सीबीआय आणि ईडी दोघेही केजरीवाल यांना अटक करतील. आम्हाला हे देखील सांगण्यात आले आहे की जर आम आदमी पार्टी ने इंडिया आघाडी सोडली तर सीबीआय नोटीस पाठवणार नाही किंवा अरविन्द केजरीवाल यांना अटक करणार नाही.

पण ‘आप’ हा मोदीजी किंवा त्यांच्या कोणत्याही एजन्सीला घाबरणारा पक्ष नाही – मग ती सीबीआय किंवा ईडी. ‘आप’ देशातील जनतेसाठी लढत राहील त्यासाठी कोणत्याही प्रकारची किमत मोजण्याची आम आदमी पार्टी च्या नेत्यांची तयारी आहे. आम आदमी पार्टी इंडिया आघाडीचा भाग राहील.

चेतन बेंद्रे,प्रदेशाध्यक्ष पदवीधर आघाडी,
आम आदमी पार्टी, महाराष्ट्र

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय