Saturday, October 12, 2024
Homeताज्या बातम्याभाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन

भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन

मुंबई : भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन झाले (Rajendra Patni) आहे. ते गेल्या दोन-तीन वर्षांपासून आजारी आहे. त्यांच्यावर मुंबईमध्ये उपचार सुरू होते. आज (शुक्रवार दि. 23)  सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. ते 59 व्या वर्षांचे होते. Rajendra Patni Passed Away

आमदार राजेंद्र पाटणी हे वाशीम जिल्ह्यातील भाजपचे एक अभ्यासू नेतृत्व होते. शिवसेनेकडून पाटणी यांनी विधान परिषद सदस्य आणि विधानसभा सदस्य म्हणून काम केले होते. २०१४ मध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि भाजपाकडूनदेखील ते कारंजा-मानोरा मतदारसंघातूम निवडून आले होते. 

पाटणी यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला आहे. एक्स अकाऊंटवर पोस्ट टाकून पंतप्रधान मोदींनी श्रद्धांजली व्यक्त केली.

संबंधित लेख

लोकप्रिय