पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करणारे पवना धरण, 91% भरले आहे. त्यामुळे धरणातून दुपारी 1 वाजल्यापासून 3200 क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे. पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तुफान पाऊस पडत असून धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी विसर्ग वाढवण्यात येत आहे. (PCMC)
नदीपात्रात उतरू नये, तसेच नदी परिसरातील विद्युत पंप आणि शेतीसंबंधी साहित्य हलविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित नागरिकांनी योग्य खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
पवनानदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येत आहे, की पवना धरण सद्यस्थितीत 91% भरलेले असून पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढलेला आहे. पाणी पातळीत व धरणाच्या येव्यामध्ये होणारी वाढ विचारात घेता धरणातील पाणीसाठा नियंत्रित करणेकरिता आज दुपारी 1:00 वाजता पवना धरणाच्या सांडव्यावरून 1800 cusecs इतक्या क्षमतेने नदीपात्रात विसर्ग करण्यात येणार आहे.
याबाबत पिंपरी चिंचवड मनपा आणि स्मार्ट सिटी प्रशासनाचे आवाहन
सद्यस्थितीत जलविद्युत केंद्रामधून विदुयतगृहाद्वारे 1400 cusecs इतक्या क्षमतेने नदीपात्रात विसर्ग सुरू असून एकुण 3200 cusecs इतक्या क्षमतेने नदी पात्रामध्ये विसर्ग होणार आहे. पाणलोट क्षेत्रात होणा-या पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्यात येईल. नदीनागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे पिंपरी चिंचवड मनपा आणि स्मार्ट सिटी प्रशासनाने आवाहन केले आहे