पिंपरी चिंचवड : भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. (pcmc)
यावेळी जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी मनोज माछरे, नितीन समगीर, विजया कांबळे तसेच विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा २१ मे पुण्यतिथी दिवस हा दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिवस म्हणून सर्व शासकीय कार्यालयात अभिवादन करून तसेच दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी शपथ घेऊन पाळण्यात येतो. (pcmc)
आज महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचा-यांनी देखील अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या उपस्थितीत “आम्ही, भारताचे नागरिक, आपल्या देशाच्या अहिंसा व सहिष्णुतेच्या परंपरेविषयी, दृढ निष्ठा बाळगून याद्वारे, सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा आमच्या सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याची, गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करीत आहोत, आम्ही सर्व मानवजातीमध्ये शांती, सामाजिक एकोपा आणि सामंजस्य टिकवू व वर्धिष्णू करू, तसेच मानवी जीवित मुल्ये धोक्यात आणणाऱ्या विघटनकारी शक्तींचा प्रतिकार करू” अशी शपथ घेतली. शपथेचे वाचन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. pcmc


हेही वाचा :
मोठी बातमी : महाराष्ट्रातील मुलींना मोफत उच्च शिक्षण मिळणार
सध्या चर्चेत असलेल्या पोर्शे कारची किंमत किती? जाणून घ्या!
‘देवाला बनवले पंतप्रधान मोदींचे भक्त’ भाजप नेते संबित पात्रा यांचे वादग्रस्त विधान
कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी भाजप नेते ब्रिजभूषण सिंग यांची न्यायालयात महत्वाची माहिती
मोठी बातमी : पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला अटक, वाचा अपघातातील धक्कादायक बाबी
ब्रेकिंग : आज १२ वीचा निकाल, इथे पहा निकाल !
राज्यात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी ५४.३३ टक्के मतदान
अलिशान कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू ; निबंध लिहिण्यासह इतर अटी टाकत 15 तासांत जामीन मंजूर
धक्कादायक : एकाच तरूणाने केले ८ वेळा मतदान, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल