आळंदी / अर्जुन मेदनकर : येथील पी.एम.पी.एम.एल. सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या कंपनीचे वतीने आळंदी -चाकण-आळंदी या मार्गावर नवीन मार्ग क्रमांक ३६४ सुरु करून अनेक वर्षां पासून बंद मार्गावर पुन्हा इंद्रायणी हॉस्पिटलच्या तसेच रुग्णांच्या आग्रहास्तव बस सेवा सुरू करण्यात आली. या सेवेचे आळंदी चाकण पंचक्रोशीतून स्वागत करण्यात आले आहे.

आळंदी चाकण मार्गावर इंद्रायणी कॅन्सर सर्वोपचार रुग्णालय असून येथे मोठ्या प्रमाणात राज्यातून रुग येत असतात. येथे येणाऱ्या रुग्नाची सोय व्हावी यासाठी मागणी प्रमाणे प्रवासी बस सेवा सुरु करण्यात आली आहे. या सेवेचे स्वागत करण्यात आले. आळंदी चाकण मार्गावर वाढलेल्या वस्तीतील नागरिकांना तसेच इंद्रायणी कॅन्सर हाॅस्पिटलला नियमित, उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांची सोय झाली.
बसची पहिली फेरी असल्याने इंद्रायणी हाॅस्पिटलच्या वतीने हाॅस्पिटलचे प्रमुख डॉ.संजय देशमुख यांचे हस्ते बसचे पूजन करण्यात आहे. यावेळी वाहक व चालक यांचा फेटा घालून सत्कार करण्यात आला. यावेळी भोसरी डेपो मॅनेजर विजय मदगे, माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, कामगार नेते अरुण घुंडरे, माजी उपनगराध्यक्ष विलास घुंडरे, दक्षता सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष किरण नरके, नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष भागवत काटकर, एल्गार सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब कवळासे, आप संघटनेचे कार्यकर्ते, हाॅस्पिटल कर्मचारी, प्रवासी, नागरिक उपस्थित होते.
हे ही वाचा :
धक्कादायक : मणिपूर हिंसाचारात स्वातंत्र्यसैनिकाच्या 80 वर्षीय पत्नीला जमावाने जिवंत जाळले
पत्नीसह पुतण्याची गोळी झाडून हत्या केल्यानंतर पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या
धक्कादायक : गेल्या सहा महिन्यांत तब्बल 87 हजार लोकांनी सोडले भारताचे नागरिकत्व
विदर्भ : नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून, स्थलांतरित नागरिकांना सर्व सुविधा पुरवा !
विशेष लेख : इर्शाळवाडी सारख्या दुर्घघटनांना मानवी हस्तक्षेपही कारणीभूत
सुवर्णसंधी ! सरकारी रुग्णालयात 14,000 पदभरती !


