Saturday, October 5, 2024
Homeआंतरराष्ट्रीयऑस्कर पुरस्कार वितरण प्रसंगी राडा, अशी मागितली जाहीर माफी !

ऑस्कर पुरस्कार वितरण प्रसंगी राडा, अशी मागितली जाहीर माफी !

ऑस्कर : काल विल स्मिथ या ऑस्कर विजेत्या अभिनेत्याने क्रिस रॉक या कॉमेडियनला थोबाडीत लगावली. विल स्मिथच्या पत्नीला-जाडाला ऑटोइम्युन आजार झाला आहे. क्रिसने तिच्या आखूड केसांच्या संदर्भाने विनोद केला होता. तो विनोद ऐकून सहन न झाल्याने विल स्मिथने थप्पड लगावली आणि आज त्याने ही माफी मागितली आहे. 

लोक नरसंहार करूनही गेंड्याच्या कातडीचे असलेले आणि माफीचा लवलेशही नसलेले पहात असताना विल स्मिथचं हे छोटंसं माफीपत्र लक्षवेधक आहे. माणूस असण्याचं, सहृदयी असण्याचं देखणं लक्षण आहे…

असा रंगला ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळा 2022 !

दरवर्षी तीन घरगुती एलपीजी सिलिंडर मोफत देण्याची “यांनी” केली घोषणा

विल स्मिथचं पत्र:

हिंसा कुठल्याही स्वरूपात विषारी आणि विनाशकारी असते. काल ॲकॅडमी पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या कार्यक्रमातलं माझं वर्तन अक्षम्य स्वरूपाचं होतं. माझ्यावर केले गेलेले विनोद हा माझ्यासाठी नेहमीचा भाग आहे; पण जाडाच्या आजारपणावरुन केलेला विनोद मला सहन झाला नाही आणि मी भावनिक आवेगात प्रतिक्रिया दिली. 

क्रिस, मी तुझी सार्वजनिकरित्या माफी मागू इच्छितो. मी मर्यादा ओलांडली आणि ही माझी चूक होती. मी खजील झालो आहे, अशा प्रकारचा माणूस मला बनायचं नाही. प्रेम आणि सौहार्द्राच्या या सुंदर जगात हिंसेला स्थान नाही. 

मला ॲकॅडमीची, शोच्या निर्मात्यांची, उपस्थितांची आणि जगभरातून पाहणा-या सर्वांचीच माफी मागायची आहे. मला विल्यमच्या कुटुंबाची आणि किंग रिचर्डच्या फॅमिलीचीही माफी मागायची आहे. आपल्या देदीप्यमान प्रवासाच्या आलेखावर हा कलंक माझ्यामुळे लागला याचा मला पश्चाताप होतोय. 

माझा माणूस म्हणून घडण्याचा प्रवास सुरुच आहे !

तुमचाच,

विल स्मिथ

Indian Navy : नौदलात 12 पास उमेदवारांसाठी 2500 पदांची बंपर भरती, वेतन 69, 100 रूपये

इंधन दरवाढीमूळे सरकार विरोधात महिला नेत्या आणि गृहिणी तीव्र संतापल्या

संबंधित लेख

लोकप्रिय