Sunday, June 2, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडखराडीमध्ये युवकांसाठी यशस्वी होण्यासाठी प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन

खराडीमध्ये युवकांसाठी यशस्वी होण्यासाठी प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन

पुणे : सुरेंद्र पठारे फाऊंडेशन व जीवनविद्या मिशन यांच्यावतीने खराडीमध्ये प्रेरणादायी व्याख्यानसत्राचे आयोज करण्यात आले होते. यावेळी जवळपास ४००० युवक युवतींनी या व्याख्यानाला उपस्थिती नोंदवली. लोकप्रिय आणि धडाकेबाज आयपीएस अधिकारी वैभव निंबाळकर यांनी ‘मी यशस्वी होणारच’ या विषयावर उपस्थित युवक युवतींना संबोधित केले.

आयपीएस वैभव निंबाळकर हे २००९ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी असून मूळचे सणसर या पुणे जिल्ह्यातील छोट्याशा गावचे आहेत, सध्या आसाम राज्य केडरमध्ये डीआयजी पदावर कर्तव्य बजावत आहेत. आयपीएस वैभव निंबाळकर हे त्यांच्या कामाची धडाकेबाज शैली आणि अमोघ वक्तृत्व यासाठी ओळखले जातात. दोन वर्षांपूर्वी आसाम आणि मिझोराम या दोन राज्यांच्या पोलीस दलांदरम्यान झालेल्या संघर्षात त्यांना गोळी लागून ते जखमी झाले होते, यानिमित्ताने त्यांचे नाव पुन्हा चर्चेत आले होते. आजच्या या व्याख्यानातून त्यांनी यश मिळविण्याची गुपिते युवकांना उलगडून सांगितली, यश मिळविण्याच्या प्रवासादरम्यान सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या संघर्षाचे महत्व, त्याला सामोरे कसे जावे याबाबत मार्गदर्शन केले. आपली प्रभावी वक्तृत्व शैली आणि अनुभवसंपन्न प्रवास याद्वारे त्यांनी उपस्थितांना खिळवून ठेवले व नेमक्या शब्दांत यशाचे सूत्र सांगितले.

यावेळी व्याख्यानाचे आयोजक आणि सुरेंद्र पठारे फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र बापूसाहेब पठारे यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्देश आपल्या मनोगतातून सांगितला. “तरुणांमधील अफाट उर्जेला फक्त योग्य दिशा देण्याची गरज असते, बरेचदा यशाकडे जाण्याचा रस्ता हरवल्याची परिस्थिती जीवनामध्ये येत असते. अशा वेळी हिंमत न हारता वाटचाल चालु ठेवण्याची गरज असते. आजचे हे व्याख्यान जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा ती हरवलेली दिशा सापडून देण्याचे काम करेल” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी वडगाव शेरी मतदारसंघाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे, सुरेंद्र पठारे फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र पठारे, शैलेश जोशी, गिरीश सुकाळे, संतोष तोत्रे, चंद्रकांत निंबाळकर आदी उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय