(मुंबई) : – कोरोना महामारीमुळे बारावीसह दहावीचा सुद्धा निकाल वेळेवर लागू शकला नाही. गेल्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. आता दहावीचा सुद्धा निकालाची तारीख जाहीर केली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. मंडळाकडून पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण अशा नऊ विभागात मार्च २०२० मध्ये १० वीची परीक्षा घेण्यात आली होती.
या वेब साईट वर पाहू शकता दहावीचा निकाल