आळंदी / अर्जुन मेदनकर : अजिंक्य डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग राष्ट्रीय सेवा योजना, अजिंक्य डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग पॉलीटेक्निक, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी देवाची, आळंदी नगरपरिषद, नमामी इंद्रायणी प्रतिष्ठान, आळंदी जनहित फाउंडेशन, श्री आळंदी धाम सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय समाजसेवा दिवस सिद्धबेट स्वच्छता, इंद्रायणी घाट वृक्षारोपण व स्वच्छता, प्रभात फेरी, प्रबोधन पर व्याख्याने आदी उपक्रम आयोजित करून श्री क्षेत्र आळंदी देवाची येथे उत्साहात साजरा करण्यात आला. Alandi news
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/IMG-20240319-WA0016-1024x766.jpg)
यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी सिद्धबेट परिसर स्वच्छता, इंद्रायणी नदी घाट स्वच्छता, इंद्रायणी लगत आळंदी सिद्धबेट मध्ये विविध प्रकारच्या औषधी व देशी वाण वृक्षांचे वृक्षारोपण उत्साहात केले.
आळंदी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून विकसित सभाग्रह हॉल मध्ये आळंदी नगरपरिषद अग्निशमन केंद्राचे वाहनाचे सहकार्याने स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला. सिद्धबेट मध्ये प्लास्टिक तसेच इतर कचरा संकलन करून नगरपरिषदेला सुपूर्द करण्यात आला. माऊली मंदिरात श्रींचे संजीवन समाधी दर्शन, महाप्रसाद वपसायदानाने कार्यक्रमाची सांगता हरिनाम गजरात झाली. Alandi
यावेळी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, राहुल चव्हाण अध्यक्ष आळंदी धाम सेवा समिती, आळंदी नगरपरिषद कर्मचारी अजय देशमुख, प्रसाद बोराटे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक दिलीप बाळासाहेब घुले, नमामि इंद्रायणी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, समन्वयक अजिंक्य डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग पॉलीटेक्निक डॉ नागेश शेळके, प्रा भूषण बिरारी, प्रा संध्या चव्हाण, प्रा मंजुश्री सहाय यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
अजिंक्य डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एफ बी सय्यद व अजिंक्य डी वाय पाटील टेक्निकल कॅम्पसच्या संचालिका डॉ.कमलजित कौर यांनी आंतरराष्ट्रीय समाजसेवा दिनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या नाविन्यपूर्वक व समाजपयोगी उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे, आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर, राहुल चव्हाण, अर्जुन मेदनकर, सचिन शिंदे,रोहिदास कदम, शशिकांतराजे जाधव, कृष्णाजी डहाके, राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिवम फुलवले शंभूराज, समर्थ, दिनेश नगरे, ओमप्रकाश, अनुराग, अथर्व, तन्मय, ओमकार आदि स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
हे ही वाचा :
ब्रेकिंग : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात महत्वाची घडामोड
बाबा रामदेव यांना झटका; सर्वोच्च न्यायालयाची अवमान नोटीस
Police Bharti : पोलीस भरती प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता !
Pune : कांद्याच्या दरात घसरण; शेतकरी हवालदिल
मोठी बातमी : सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँकेला पुन्हा धरले धारेवर
अजमेर मध्ये रेल्वेचा भीषण अपघात, ४ डबे रुळावरून घसरले रुळही उखडले