NHAI : देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरील टोलच्या दरात आजपासून वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ 3 ते 5 टक्क्यांनी वाढ होणार आहे. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) ने ही घोषणा केली आहे. आजच अमुल दुधाच्या किंमतीत वाढ झाली असताना आता टोलच्या दरात वाढ झाल्याने सर्व सामान्यांना आणखी एक झटका बसला आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून आजपासून 1 हजार 100 टोल प्लाझावरील टॅक्समध्ये वाढ करण्यात आली आहे. NHAI ने महामार्गावरील टोल टॅक्सच्या दरात 3 ते 5 टक्क्यांनी वाढ केली आहे. खरं तर टोलच्या किमतीमधील ही दरवाढ 1 एप्रिलपासून लागू होणार होती. मात्र लोकसभा निवडणुकांमुळे ही दरवाढ पुढे ढकलण्यात आली. अखेर आजपासून वाहनचालकांना अनेक टोल प्लाझांवर 3 ते 5 टक्के जास्त टोल टॅक्स द्यावा लागणार आहे.
दरम्यान, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने जारी केलेल्या सुचनेनुसार, टोलनाक्याच्या २० किलोमीटरच्या परिघातघात राहाणाऱ्या लोकांचे मासिक पासचे दरही वाढले आहेत. नवीन दर आता 2 जून, रविवारी रात्रीपासून 12 वाजेपासून लागू केले जातील. सोमवारपासून देशभरात रोड टोल वाढणार आहेत, असे देखील NHAI च्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा :
‘गाढवाचं लग्न’ मधील लोककलावंत प्रभा शिवणेकर यांचे निधन
HAL : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती
मत्स्यव्यवसाय विभागात भरती, पगार 2 लाखांपर्यत
सासरच्या मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
दुचाकीत साडीचा पदर अडकून पुण्यातील महिलेचा मृत्यु
नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन
एसटी महामंडळात विविध पदांसाठी मोठी भरती
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची संधी
संतापजनक : मनुस्मृतीचे दहन करायला गेले बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र फाडले