Friday, November 22, 2024
Homeजिल्हाKolhapur : लोकशाहीत स्वातंत्र्य जिवंत राहण्यासाठीची चळवळ नेटाने पुढे नेऊ – डॉ.भारत...

Kolhapur : लोकशाहीत स्वातंत्र्य जिवंत राहण्यासाठीची चळवळ नेटाने पुढे नेऊ – डॉ.भारत पाटणकर

कोल्हापूर : आजरा येथे भारतीय मुस्लिम समाजाच्या न्याय हक्क व अधिकारासाठी तसेच भारतीय मुस्लिम समाजाबद्दल असलेले भ्रम आणि वास्तव” याबाबतीत “संविधान परिषद” मौलाना आझाद संविधान गट; संविधान सन्मान परिषद आणि मुक्ती संघर्ष समिती यांच्या वतीने घेण्यात आली. (Kolhapur)

या परिषदेचे उद्घाटन डॉ.भारत पाटणकर, डॉ.नवनाथ शिंदे (ज्येष्ठ विचारवंत); बाळेश नाईक (नेते, जनता दल); अब्दुलवाहिद सोनेखान (माजी सैनिक भारत सरकार), प्रमोद पाटील व संग्राम सावंत यांच्या हस्ते मशाल पेटवून कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत.

भूमिका मांडताना संग्राम सावंत राज्याध्यक्ष मुक्ती संघर्ष समिती म्हणाले, हिंदू मुस्लिम एकत्र येऊन करणार आम्ही संविधानिक मार्गाने जाणार आहोत.मुस्लिम समाजाच्या याबाबतीत ठोस पावले शासनाने व प्रशासनाने गांभीर्यपूर्वक उचलली पाहिजेत.यासाठी संघटित होऊन.लढा नेटाने उभा भारतीय संविधानाला घेऊन करणार आहोत.यासाठी परिषद घेत आहोत. (Kolhapur)

या परिषदेचे बीजभाषण भाषण करताना डॉक्टर भारत पाटणकर म्हणाले की, आपण कष्टकरी वर्गासाठी घेतलेली संविधान परिषद ही ग्रामीण भागात होत असताना एक मोलाची गोष्ट आहे. राबणाऱ्या-कष्टकरी जनतेच्या, न्याय्य अधिकार-हक्कासाठी व लोकशाहीत स्वातंत्र्य जिवंत राहण्यासाठीची चळवळ नेटाने हिंदू मुस्लिम एकत्र येऊन करणार आम्ही करणार आहोत. (Kolhapur)

रशीद पठाण, अहमदसाब मुराद,जुबेर चॉंद, अबुसईद माणगावकर, निसार लाडजी, समीर चॉंद, सलिम लतिफ, इम्रान चॉंद, समीर खडकवाले, झाकीर नाईक, अलताफ मदार, साबीर वाटंगी, मुस्तफा मुजावर, मुबारक नुलकर, जावेद मुजावर, डॉ.उल्हास त्रिरत्ने, कॉम्रेड काशिनाथ मोरे, मजीद मुल्ला, जुबेर माणगावकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

वंचिताचे नेते महेश परूळेकर प्रमुख मांडणी करताना म्हणाले, की संविधान तळातल्या तळच्या माणसाचा विचार करते संविधान हे जात धर्म पंथ असा भेद न मानता समतेची आणि न्यायाची भूमिका भारतीय राज्यघटनेत अल्पसंख्याकांच्या भ्रम आणि वास्तव दूर करण्यासाठी सत्याचा पुढाकार घेऊन आपल्याला भारतीय राज्यघटनेला घेऊन चालावे लागेल.

मुस्लिम समाज भ्रम आणि वास्तव याबाबतची मांडणी करताना फारूख गवंडी सामाजिक कार्यकर्ते म्हणाले, भ्रम आणि वास्तव्याचा विचार विवेक वादाच्या कसोटीला घेऊन करावा लागेल भारतीय समाजामध्ये असे भ्रम पै उपलब्ध तयार करून जन माणसांचं मन आणि मेंदू बिघडवला जात आहे यासाठी आपण सर्वांनी भारतीय संविधानाला घेऊन या सगळ्या गोष्टींना लढा देण्यासाठी एकत्र आले पाहिजे.

परिषदेच्या शेवटी संविधानाला प्रमाण मानून वेगवेगळे ठराव करण्यात आले. स्वागत हे कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित सच्चर समिती आणि मागासलेले मुस्लिम हे पुस्तक देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर खेडेकर यांनी केले.प्रास्ताविक मौजुद मानगावकर यांनी केले तर आभार प्रदर्शन अब्दुलकरीम कांडगावकर यांनी व्यक्त केले. परिषदेला मुस्लिम समाजासह कष्टकरी राबणाऱ्या स्त्री-पुरुष लोकांची उपस्थिती होती.

परिषदेचे ठराव पुढीलप्रमाणे (Kolhapur) :

१) मुस्लिम समाजाच्या वेगवेगळ्या प्रश्नांच्या पातळीवर महाराष्ट्र राज्यभर ही मोहीम आम्ही खालील मुद्द्याला घेऊन राबवणार आहोत.
२) जमिनी मिळविण्याचा प्रश्न, कर्जे मिळविण्याचा प्रश्न, कारागिरांचे खास प्रशिक्षण मिळविण्याचा प्रश्नांची सोडवणूक करणार.
३)अल्पसंख्यांक समाजाच्या खास संस्था उभारण्याचा व टिकविण्याचा प्रश्न, एकूण शिक्षणाचा विस्तार करण्याचा प्रश्न, मुस्लिम ओबीसी यांच्या नोंदी राज्य व केंद्रीय मागासवर्गीय कमिशनकडे करण्याचा प्रश्नासाठी लढा करणार.
४)महाराष्ट्रातील मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न, मदरशांना शाळेचा दर्जा देऊन मदरशातील विद्यार्थ्यांना मुख्यप्रवाहातील शिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रश्न, मदरशांचे आधुनिककरण व सक्षमीकरण करण्याचा प्रश्न, वक्फ बोडांच्या जमिनीवरील अतिक्रमण काढण्याचा प्रश्नाबाबतीत प्रत्येक पक्षाला निवेदन देणार.
५) अल्पसंख्यांक आयोगाला संविधानिक दर्जा देण्यासाठी आणि मुस्लिम बहुल वस्त्यांच्या सुधारणे करीता मुस्लिम वस्ती सुधार योजना सुरू करण्याचा करण्यासाठी व शासकीय सेवा व नोकऱ्यांमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करणार.
६) हुकूमशाहीची व एकाधिकारशाहीची वाट मोकळी होऊन फॅसिझमचे धोके या देशात वाढलेले आहेत. त्यामुळे भारतीय संविधानाचा प्रचार प्रसार करण्यासाठी संविधान सन्मान परिषदेच्या माध्यमातून करणार आहे.
७) महाराष्ट्राच्या पातळीवर छत्रपती शिवरायांच्या लढ्यात स्वातंत्र्य लढ्यात वेगवेगळ्या सामाजिक समतेच्या लढ्यात ज्या ज्या मुस्लिम समाजातील नायक-नायकांनी जो लढा संघर्ष आणि वैचारिक योगदान दिले त्यांचे स्मारक मुंबई येथे उभे राहिले पाहिजे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : महाराष्ट्रातील झिका विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक नियमावली जाहीर

धक्कादायक! अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने कॉलेजच्या टॉयलेटमध्ये दिला बाळाला जन्म

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अमली पदार्थांचे प्रकरण विधानपरिषदेत

ब्रेकिंग : वैद्यकीय अधिकारी संवर्गाच्या पदभरतीसाठी महत्वाची बातमी

सर्वात मोठी बातमी : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठे बदल, तारिखही वाढविली

धक्कादायक : सत्संग कार्यक्रमातील चेंगराचेंगरीत 87 जणांचा मृत्यू, देशभरात खळबळ

ब्रेकिंग : दूध उत्पादकांसंदर्भात महत्वाची बातमी, सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

ब्रेकिंग : आदिवासी विकास विभागातील भरती संदर्भात मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

स्वस्त धान्य दुकानाचा परवानाचा हवाय ? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची

संबंधित लेख

लोकप्रिय