Sunday, December 22, 2024
Homeग्रामीणमहिला आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार घरोघरी पोहोचविणार : जयमाला गायकवाड

महिला आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार घरोघरी पोहोचविणार : जयमाला गायकवाड

22 व्या वर्धापनदिनी राष्ट्रवादी महिला काँग्रेस कार्यकारिणीच्या नामफलकाचे अनावरण

सांगोला (अतुल फसाले) : 22 जून 1999 रोजी सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेत शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली. पक्षाची ध्येय धोरणे आणि विचार गेल्या 21 वर्षांत महाराष्ट्रातील खेडोपाडी पोहोचला आहे. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसचा क्रांतिकारी आणि परिवर्तनवादी विचार महिला आघाडीच्या माध्यमातून घरोघरी पोहोचवून, महिला सक्षमीकरणास प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद अध्यक्षा आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा जयमाला गायकवाड यांनी केले.

पक्षाच्या 22 व्या वर्धापनदिनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर व उपाध्यक्षा जयमला गायकवाड यांच्या सूचनेनुसार सांगोला शहर व तालुक्याच्या संपूर्ण कार्यकारिणीच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.  

राष्ट्रवादी महिला कार्यकारिणीतील सदस्यांच्या नामफलकाचे अनावरण राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या माध्यमातून गावोगावी खेडोपाडी करण्यात येईल असेही यावेळी जयमला गायकवाड यांनी स्पष्ट केले. 

पुढे बोलताना जयमला गायकवाड म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस हा केवळ राजकीय पक्ष नव्हे तर तो एक सामाजिक परिवर्तनाचा विचार आहे. गेल्या 22 वर्षाच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच समाजहित नजरेसमोर ठेवून निरपेक्ष भावनेने निरंतर कार्य केले आहे. यामुळेच महाराष्ट्रातील सर्व समाजातील आणि समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला भरभरून प्रेम दिले आहे. यापुढील काळातही त्याच सामाजिक भावनेतून शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचेसह खासदार सुप्रियाताई सुळे व प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे कार्य सर्वसामान्य नागरिकांसाठी करत राहू, असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला.

यावेळी माजी आमदार दिपक साळुंखे-पाटील, जेष्ठ नेते बाबुराव गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत शिंदे, शहराध्यक्ष तानाजी पाटील, तालुका युवक अध्यक्ष अनिल खटकाळे, डॉ. पियुष साळुंखे-पाटील, नगरसेवक सोमराव लोखंडे, अनिल खडतरे, माजी उपसभापती शोभा खटकाळे, नगरसेविका पूजा पाटील, सुनीता खडतरे, महिला आघाडीच्या अध्यक्षा सखू वाघमारे, विधानसभा मतदारसंघ अध्यक्षा सुचिता मस्के, जवळा गावच्या सरपंच सविता बर्वे, नगरसेविका भामाबाई जाधव शहर अध्यक्षा शुभांगी पाटील, उपाध्यक्षा जयश्री पाटील, मंगल खाडे, अनुराधा पाटील, सरचिटणीस सुजाता कांबळे, सरस्वती रणदिवे, वनिता बनसोडे, सचिव शकुंतला खडतरे माजी नगरसेवक नाथा जाधव, विजय यालपले, विजय पवार, सरपंच नंदकुमार दिघे, अनिल दिघे, डॉ. धनंजय पवार, ऍड संपत पाटील, दादा खडतरे, आलमगीर मुल्ला, सतिश काशीद, संतोष पाटील, दत्ता बर्वे, नारायण माळी, बापू कोळेकर, चंद्रकांत करांडे, शहाजी खरात, शिवाजी कोळेकर, हिंदुराव घाडगे, दिलीप मोटे, सुनीलआबा साळुंखे, चंद्रकांत चौगुले, अमर घाडगे, दिलीप नागणे, ज्ञानेश्वर शिंदे, अजित गोडसे हे उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय