Navneet Rana : अमरावतीतील भाजपच्या उमेदवार नवनीत राणा व त्यांचे पती रवी राणा यांना सत्र न्यायालयाने 9 मे रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. कायदा व सुव्यवस्था बिघडवल्या प्रकरणी हे आदेश देण्यात आले आहे.
नवनीत राणा (Navneet Rana) व त्यांचे पती रवी राणा यांनी दोन वर्षांपूर्वी हनुमान चालिसा पठणचा प्रयत्न करून कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याचा आरोप आहे. त्याप्रकरणी सत्र न्यायालयाने आदेश दिले आहेत.
शुक्रवारी अमरावतीमध्ये मतदान होते. त्यामुळे न्यायालयाने त्यांना हजेरीपासून एक दिवस सूट दिली, मात्र पुढील तारखांना हजर राहण्याचे बजावले.
काय आहे प्रकरण ?
एप्रिल 2022 मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ बंगल्याबाहेर राणा दाम्पत्याने हनुमान चालिसा पठणचा दिखावा केला होता. या प्रकरणात कायदा-सुव्यवस्था बिघडवल्याच्या आरोपाखाली दोघांविरुद्ध सत्र न्यायालयात खटला सुरू आहे. दोघांनी दोषमुक्ततेसाठी केलेला अर्ज न्यायालयाने डिसेंबरमध्ये फेटाळला होता.


हे ही वाचा :
ब्रेकिंग : शिक्षकांची आंतरजिल्हा बदली आता कायमची बंद!
नवनीत राणांच्या सभेसाठी महिलांना वाटले ३०० रूपये ? मध्यस्थाने घेतले ७०० रूपये, व्हिडिओ व्हायरल
मोठी बातमी : भाजप उमेदवाराकडून 4.8 कोटींची रोकड जप्त, निवडणूक आयोगाची कारवाई
मोठी बातमी : WhatsApp ची भारतातून सेवा बंद करण्याची धमकी
बिझनेस करायची आयडिया आहे? मग शासनाची “ही” योजना करेल मदत!
ब्रेकिंग : EVM बाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
कांदा निर्यातीच्या धोरणावरून डॉ. कोल्हे यांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्ला
मोठी बातमी : माजी आमदार जे.पी.गावित यांना माकप कडून उमेदवारी जाहीर