Thursday, December 26, 2024
Homeराज्यराष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशची कार्यकारिणी जाहीर

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशची कार्यकारिणी जाहीर

मुंबई : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेशची नवीन प्रदेश कार्यकारिणी आज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस हा २०१९ च्या निवडणुकीचा मुख्य पाया आहे, असे मत जयंत पाटील यांनी यावेळी मांडले. 

मागील कालखंडात यश-अपयश अनुभवत आपण पक्ष मोठा केला, आजही करत आहोत. त्यामुळे २०२९ च्या निवडणुकांमध्ये पक्षाच्या जास्तीत जास्त जागा निवडून येतील, असं काम आपल्याला करायचं आहे, असे ते म्हणाले. त्यासाठी सर्व विद्यापीठे, महाविद्यालयांबरोबरच महाराष्ट्रातील सर्व तालुक्यात  आपली संघटना असायला हवी. सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे प्रश्न संघटनेने प्राधान्याने मांडावेत. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडावी, असे आवहान जयंत पाटील यांनी उपस्थितांना केले. त्याचबरोबर विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांची विद्यार्थी संघटनेच्या कार्याबद्दल प्रशंसा केली आहे.

यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया दुहान यांनी बैठकीला संबोधित करताना राजकारणापेक्षा समाजकार्यावर भर देण्याचे आवाहन केले. तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हे पद कायमस्वरूपी नाही, जो काम करेल त्याला पदावर राहता येईल, एकदा काम करणं थांबलं की पद राहणार नाही याची जाणीव सर्वांनी ठेवायला हवी. नेता म्हणून नाही तर कार्यकर्ता म्हणून प्रत्यकाने समाजाप्रती काम केले पाहिजे असेही ते म्हणाले. 

या कार्यक्रमास आ. अमोल मिटकरी, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, याचबरोबर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेशचे विभागीय अध्यक्ष सुहास कदम, संध्या सोनवणे, प्रशांत कदम, किरण शिखरे, चिन्मय गाढे, अविनाश चव्हाण, आशिष आवळे त्याचबरोबर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माहिती तंत्रज्ञान अध्यक्ष जितेश सरडे व जावेद ईनामदार आदी मान्यवर तसेच विद्यार्थी संघटनेचे नवनिर्वाचित पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी खालील पदाधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली.

● प्रदेश सरचिटणीस – विभागनिहाय : आशिष वाघमारे (लातुर) मुख्य, डॉ.श्रीराम रगड (बुलढाणा) वैद्यकीय, सुधीर शिरसाठ (अहमदनगर अभियांत्रिकी, अमोल पाटील (नाशिक) औषधनिर्माण, सुयश पाटील (सांगली) कृषी, रोहित अहिरे (नाशिक) व्यवस्थापन, गणेश डिंबळे (पुणे) विधी, अमित कुटे (बीड) कला वाणज्य विज्ञान, सादिक शेख (औरंगाबाद) शालेय शिक्षण, मधुकर सावंत (औरंगाबाद) ललितकला, नेताजी साळुंके (बीड) शिष्यवृत्ती, सौरभ देशमुख (अहमदनगर) रोजगार, तुषार जगताप (पुणे) –  कौशल्य विकास

● प्रदेश निरीक्षक : ऋषी परदेशी (पुणे), अतुल शिंदे (सातारा)

● प्रदेश सचिव :  मुज्जम्मील अब्दुल्ला शेख (पुणे)

● जिल्हाध्यक्ष : अमोल काळणे (अकोला ग्रामीण), अभिजीत हिंगणे (अकोला शहर/जिल्हा), रितेश बोबडे (यवतमाळ), भूषण दाभाडे (बुलढाणा), प्रथमेश ठाकरे (अमरावती), ज्ञानेश पाटील (सांगली), राहुल कवडे (सोलापुर), डॉ. वैभव कळसे (सातारा), रोहित गमलादु (उल्हासनगर), यश साने (पिंपरी चिंचवड शहर)

● प्रदेश संघटक : मुबीन मुल्ला (कोल्हापूर), ओंकार गुंड (अहमदनगर), नागेश खळदकर (पुणे), आदित्य टाले (अमरावती), जावेद ईनामदार (पुणे)

● सोशल मीडिया प्रदेश समन्वयक : शुभम जठाळ (लातुर)

● पर्यावरण समिती प्रदेश समन्वयक : शिवशंभु पाटोळे (पुणे), यश कुलकर्णी (अहमदनगर)

● मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष – विभाग निहाय : डॉ.अमोल धदंरे (BHMS) (हिंगोली) वैद्यकीय, आकाश हिवराळे (औरंगाबाद) औषधनिर्माण, स्वप्निल माने (उस्मानाबाद) – कृषी 

● नागपूर विभागीय उपाध्यक्ष – डॉ. उदय प्रकाश बोरकर (अमरावती) वैद्यकीय

● अमरावती विभागीय उपाध्यक्ष – विभाग निहाय डॉ.रवी सपकाळ(बुलढाणा) वैद्यकीय, विवेक सावडे (यवतमाळ) औषध निर्माण, वैभव बोरकर (वाशीम) कृषी

● नाशिक विभागीय उपाध्यक्ष – विभाग निहाय : डॉ. निलेश मोरे (नाशिक) वैद्यकीय, परीक्षीत तळोकार (नाशिक) अभियांत्रिकी, शुभम बंब (अहमदनगर) विधी

● पश्चिम विभागीय उपाध्यक्ष – विभाग निहाय : डॉ. सहर्ष घोलप (अहमदनगर) वैद्यकीय, विनोद भांगे (सोलापुर) कृषी, अनुप कारंडे (सांगली) व्यवस्थापन

● कोकण विभागीय उपाध्यक्ष – विभाग निहाय : डॉ. सागर पाटील (धुळे) वैद्यकीय

● पुणे विभागीय उपाध्यक्ष – विभाग निहाय : डॉ. उमेश चव्हाण(BAMS) वैद्यकीय, भैरव साठे (पुणे) अभियांत्रिकी, संकेत वायकर (पुणे) कृषी

● विद्यापीठ अध्यक्ष : सुवर्णभूषण देसाई (सांगली) अध्यक्ष शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर

संबंधित लेख

लोकप्रिय