Monday, December 23, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC:वयाच्या 60 व्या वर्षी केलेली नर्मदा परिक्रमा आयुष्यातील मोठी तपस्या आहे-संजय ...

PCMC:वयाच्या 60 व्या वर्षी केलेली नर्मदा परिक्रमा आयुष्यातील मोठी तपस्या आहे-संजय कठाळे

निगडी येथे स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळात ‘नर्मदा परिक्रमा एक अनुभव कथन’ उत्साहात संपन्न

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:वयाच्या ६० व्या वर्षी बायपास सर्जरी झाली असताना व उच्च रक्तदाब व अनेक व्याधीने शरीरावर परिणाम केले असताना१ डिसेंबर २०२० ते ३ एप्रिल २०२१ असे १२४ दिवसात पायी परिक्रमा पुर्ण केली होती.
कुलस्वामिनीच्या शोधात नर्मदा परिक्रमाची संकल्प केली आणि मैयेच्या सहवासात मी खडखडीत बरा झालो आणि नर्मदा परिक्रमा सिद्धीस नेली.या परिक्रमेचे अनुभव कथन करताना संजय कठाळे यांनी वरील भावना व्यक्त केल्या.

नर्मदा ही जीवनदायीनी आहे
स्वच्छ घाट,पाणी नदीचा पात्रही स्वच्छ असुन नदीकाठचे लोक परिक्रमार्थीना खुप मानतात, त्यांची जमेल तशी मदत करतात,गरीबी असुनही दातृत्व खुपच मोठे आहे.नर्मदा नदी महान आहेच पण माणसांमधेही देवत्व पहायला मिळाल हीच खरी परिक्रमा.नर्मदा परिक्रमा आयुष्यातील खूप मोठी साधना व तपस्या आहे.आयुष्यात प्रत्येकाने एकदा तरी नर्मदा परिक्रमा करावी.अनेक लोकांचे जीवन सुफलित केले आहे.परिक्रमेत प्रत्येकालाच तिची अनुभूती वेगवेगळ्या रूपात येते. ती मोक्षदायिनी आहे,असे प्रतिपादन नागपूर येथील जेष्ठ नर्मदा परिक्रमावासी,संजय वासुदेव कठाळे यांनी केले.त्यांचा ‘अगं नर्मदे’ हा पुस्तक सुद्धा सर्वत्र प्रसिद्ध झाला आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या महिला विभाग व संस्कृती संवर्धन विकास महासंघाच्या वतीने आयोजित केलेल्या ‘नर्मदा परिक्रमा कथा अनुभव’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी जबलपूर येथील परिक्रमावासी संदीप प्रकाश परांजपे यांनी नर्मदा मैया तीर्थ व प्रसाद सर्वांना उपलब्ध करून दिला.


कार्यक्रमाची सुरुवात नर्मदा मातेच्या प्रतिमेचं पूजनाने सुरुवात झाली, संजय कठाळे व ह.भ.प. किसन महाराज चौधरी यांचा स्वागत व सत्कार करण्यात आला.
प्रसंगी भास्कर रिकामे, विकास देशपांडे, विश्वास करंदीकर, चंद्रशेखर जोशी, सतीश सगदेव, माधुरी ओक,वैदेही पटवर्धन, हर्षदा कापटकर ,उज्वला जाधव , वीणा महाजन, राधिका सुखटणकर, उन्नती वैद्य तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे महिला विभाग व महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते व परिसरातील सुमारे १५० नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपदा पटवर्धन यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अश्विनी अनंतपुरे व डॉ. अजित जगताप यांनी केले. परिचय ज्योती कानिटकर यांनी करून दिले. शिवानंद चौगुले यांनी आभार मानले.

संबंधित लेख

लोकप्रिय