मुंबई – पुणे, पिंपरी चिंचवड सह राज्यातील मोठ्या शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या जटील बनली आहे. अलीकडील नुकत्याच आलेल्या रिपोर्ट नुसार पुणे शहर हे जगातील सर्वात चौथे वाहतूक कोंडींचे शहर बनले आहे. (Mumbai)
पुणे पिंपरी चिंचवड शहरात चार चाकी खरेदी करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पार्किंगची जागा उपलब्ध नसताना अनेक ठिकाणी हाउसिंग सोसायट्या, सार्वजनिक पदपथ, सरकारी कार्यालये, प्रवासी बस थांबे आणि गर्दीचे प्रशस्त रस्ते याठिकाणी चार चाकी कार, मालवाहतुकीची वाहने रस्त्यावर बेकायदेशीररीत्या पार्क करून वाहतूक कोंडी वाढत आहे.
तसेच चार चाकी वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे प्रदूषण आणि अपघात प्रमाण वाढत आहे.
वाहतूक कोंडीसह अन्य समस्या सोडविण्यासाठी मोठ्या शहरांमध्ये वाहनांच्या संख्येवर सरकार मर्यादा आणणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून नवीन गाडी खरेदी करण्यापूर्वी हौसिंग सोसायट्या आणि पालिकेच्या वाहनतळामधील पार्किंग सुविधेचे प्रमाणपत्र बंधनकारक केले जाणार आहे.
असे प्रमाण पत्र असल्याशिवाय नव्या गाडीची नोंदणी परिवहन विभागाकडून होणार नाही, पार्किंग प्रमाण पत्र असलेल्या गाडीला वाहतूक विभागाकडून टॅग दिला जाईल. आणि त्यानंतर चार चाकी वाहने खरेदी करण्यास परवानगी मिळेल, असे परिवहन सूत्रांकडून सूचित करण्यात आले आहे.
त्यासंबंधातील प्रस्ताव लवकरच वाहतूक विभागाकडून महाराष्ट्र सरकारला सादर केला जाणार आहे. मात्र, यामधून रिक्षा आणि दुचाकींना वगळण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच परिवहन विभागाचा 100 दिवसांत करावयाच्या कामाचा आढावा घेतला. त्यावेळी वाहतूक विभागाने आराखडा सादर केला आहे. . (Mumbai)
सध्या महाराष्ट्रात सध्या अंदाजे 3.8 कोटी वाहने आहेत. दरवर्षी यात 10 टक्के नव्या वाहनांची भर पडते. नव्या गाड्यांची होणारी नोंदणी पाहता ही संख्या 2030 पर्यंत 6.7 कोटींवर पोहोचण्याची शक्यता आहे.
विद्यमान वाहतूक व्यवस्थेवर अधिक ताण येऊ नये, यासाठी राज्यातील वाहनसंख्येवर निर्बंध आणण्याची गरज असल्याचेही वाहतूक विभागाने म्हटले आहे.
वायू आणि ध्वनी प्रदूषणाबरोबरच वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नवीन वाहनांना अधिकृत पार्किंगची सुविधा अनिवार्य केली जाणार आहे. या योजनेसाठी परिवहन विभागाला विशेष अधिकार मिळणार असून स्थानिक स्वराज्य संस्थांना संबंधित शहरांमध्ये सार्वजनिक व खासगी पार्किंगची जागा निर्देशित करावी लागणार आहे.
विशेषतः गृहनिर्माण सोसायटीचे आवारात बेकायदेशीर विना परवाना चार चाकी गाड्या पार्किंग करणाऱ्या ग्राहकांना सोसायटीचे प्रमाण पत्र नवीन गाडी खरेदी करताना तसेच जुनी खरेदी केलेली गाडी पार्किंग साठी पार्किंग प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे.
सरकारच्या डिजिटल पोर्टलवर वाहनांना पार्किंगचे प्रमाणपत्र स्थानिक संस्थांना द्यावे लागेल. त्याचबरोबर गृहनिर्माण सहकारी संस्थांद्वारे केले जाणारे पार्किंगचे वाटप अंतिम समजले जाईल, असे वाहतूक विभागाने आपल्या आराखड्यात म्हटले आहे.
प्रस्तावित योजनेतून दुचाकी व तीनचाकी प्रवासी वाहनांना वगळण्यात आले असून, केवळ चारचाकी वाहनांसाठी ही योजना असणार आहे. मात्र, पार्किंगचे प्रमाणपत्र असल्यानंतर नव्या वाहनांना एक नवीन आयडी टॅग दिले जाणार आहे.(Mumbai)
गाड्या भंगारात काढाव्या लागणार
जुन्या गाडीची मुदत वाढवून घेताना त्यांना पार्किंगचे प्रमाणपत्र दाखवावे लागणार आहे; अन्यथा अशा गाड्या भंगारात काढाव्या लागणार आहेत. ही योजना अंमलात आल्यानंतर नव्या वाहनांच्या नोंदणीमध्ये संबंधित अधिकृत पार्किंग क्षेत्र नोंदणी क्रमांकाशी जोडले जाणार आहे.