Thursday, November 21, 2024
Homeताज्या बातम्याMumbai : आदिवासी आमदारांचे मंत्रालयात आंदोलन, मंत्रालयाच्या जाळीवर मारल्या उड्या

Mumbai : आदिवासी आमदारांचे मंत्रालयात आंदोलन, मंत्रालयाच्या जाळीवर मारल्या उड्या

Mumbai: विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी सीताराम झिरवळ आणि काही सत्ताधारी आमदारांनी मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उड्या मारण्याची धाडसी घटना घडली आहे.उड्या मारण्यापूर्वी झिरवळ यांच्यासह काही आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. मात्र या भेटीतून काही सकारात्मक निर्णय न आल्याने या सत्ताधारी आमदारांनी जीव धोक्यात घालून मंत्रालयातील जाळीवर उड्या मारल्या.

आदिवासी समाजाच्या समस्यांसाठी झिरवळ यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत दोन वेळा चर्चा केली होती. मात्र, या चर्चांमध्ये कोणतेही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने झिरवळ यांनी “मुख्यमंत्री आमचे ऐकत नसतील तर आमच्याकडे प्लॅन बी आहे,” असे सांगितले.

तर दुसरीकडे आदिवासांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बुधवारी (02 ऑक्टोबर) सह्याद्री अतिथीगृह येथे भेटायला गेलेल्या राज्यातील आदिवासी आमदारांना भेटीसाठी तब्बल सात तास वाट बघावी लागली. सात तास बसून राहून मुख्यमंत्री शिंदे यांची भेट न होऊ शकल्याने आदिवासी आमदारांमध्ये त्यांच्याविषयी नाराजी होती.यानंतर आदिवासी आमदारांनी आज, शुक्रवारी (04 ऑक्टोबर) मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. मात्र त्यानंतर नरहरी झिळवाळ यांच्यासह काही आदिवासी आमदारांनी मंत्रालयातील जाळीवर उड्या मारल्या. मंत्रालयातील मंत्रिमंडळाची बैठक सुरू असतानाच बाहेर आदिवासी आमदारांचं आंदोलन सुरु आहे.

या घटनेनंतर झिरवळ यांची प्रकृती बिघडली असून त्यांचा रक्तदाब वाढला. त्यांच्या तपासणीसाठी डॉक्टरांची टीम मंत्रालयात दाखल झाली. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत आमदारांना सुरक्षितपणे बाहेर काढले. परंतु, यानंतरही त्यांच्या आंदोलनात कमी होत नाही.

आदिवासी आमदारांची मुख्य मागणी एसटीच्या आरक्षणास धक्का लागू न देण्याबाबत आहे, तसेच पेसा कायद्यानुसार भरतीची मागणी त्यांनी केली आहे. झिरवळ यांनी स्पष्ट केले की, “आदिवासी आरक्षणाअंतर्गत धनगरांना आरक्षण देऊ नये,” या मागणीसोबतच नरहरी झिरवाळ यांनी आदिवासी आमदार आंदोलनातही सहभाग घेतला आहे. झिरवळ यांनी सांगितले की, “आमच्या समाजाने आम्हाला इथपर्यंत पोहोचवले, त्यांच्या हक्कांचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे.”

Mumbai

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

स्टेट बँकेची बनावट शाखा उघडून फसवणुकीचा धक्कादायक प्रकार

महाराष्ट्रातील या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस होणार बंद, ही आहेत कारणे

धक्कादायक : झारखंडमध्ये बॉम्बस्फोटाने उडवला रेल्वे ट्रॅक

आमदार अतुल बेनके यांच्या समर्थकांनी घेतली शरद पवारांची भेट, पवारांकडे केली ‘ही’ मागणी

दिवाळीपूर्वीच महागाईचा झटका! गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या नवे दर

नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गंभीर दखल

अभिनेता गोविंदाला लागली गोळी, रुग्णालयात उपचार सुरू

मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत युवासेनेचा विजय, आदित्य ठाकरेंचा दबदबा कायम

महाविद्यालयाच्या आवारात युवतीवर अत्याचार, चार महाविद्यालयीन युवकांवर गुन्हा दाखल

मेट्रोच्या मॅनहोलमध्ये पडून महिलेचा मृत्यू, नागरिकांचा संताप

धक्कादायक : सासरच्या लोकांनी घरातच केला गर्भपात, आई आणि बाळ दोघांचा मृत्यू

संबंधित लेख

लोकप्रिय