Mumbai : मैत्रिणीवर छाप टाकण्यासाठी पोलिस बनून बार व्यवस्थापकाला धमकावण्याची घटना घडली आहे. बोगस पोलिस सलमान याची मैत्रिण एका बार मध्ये सिंगर म्हणून काम करत होती. तीला व्यवस्थापकांनी कामावरुन काढून टाकल्याने त्याने बनावट पोलिसाचा पोशाख परिधान करत व्यवस्थापकाला धमकावले. पनवेल शहरात ही घटना घडली आहे. Mumbai
मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या पनवेल पूणे महामार्गावरील पळस्पेफाटा येथील लेडीज सर्व्हीस बार आहे. बोगस पोलिस सलमानची मैत्रीण या बारमध्ये गायिका म्हणून काम करत होती आणि व्यवस्थापकांनी कामावरून काढून टाकल्याने ती नाराज होती. तिची सहानुभूती आणि प्रेम मिळवण्यासाठी, सलमानने पोलिसाचा गणवेश परिधान करून बारमध्ये प्रवेश केला आणि तिच्यासमोर धाक दाखवला. Mumbai
बोगस पोलिस सलमान बुधवारी रात्री आठ वाजता पळस्पे फाटा येथील गोल्ड डिगर या लेडीज ऑक्रेस्ट्रा या बारमध्ये सलमान हा पोलीस अधिकाऱ्यांच्या गणवेशात बारचे व्यवस्थापक सूरेश गुप्ता यांच्याकडे आला. त्यावेळी सलमानने मैत्रिणीला कामावरुन का काढले असा जाब विचारत, व्यवस्थापकाला शिविगाळ केली. तसेच धक्काबुक्की करत व्यवस्थापक सुरेशच्या कानशिलात लगावली. संतापलेल्या व्यवस्थापक सुरेशने स्थानिक पोलिसांना संपर्क साधल्यावर काही मिनिटांतच तिथे पोलिस पोहोचले.
विचारपुस करताना सलमानची झाली तारांबळ
सुरूवातील स्थानिक पोलिसांनी सलमानला पोलिसांच्या खाकी वर्दीमध्ये पाहून सावध पवित्रा घेतला. तसेच सलमानच्या खांद्यावर दोन तारका असल्याने सलमान सहाय्यक पोलीस निरीक्षक असल्याचा समज पोलिसांना झाला. पोलिसांनी सलमानला कुठल्या पोलीस ठाण्यात नेमणूक आहे. त्याची पदश्रेणी कोणती, तो कोणत्या साली म्हणजे कोणत्या बॅचचा पोलीस झाला याची माहिती विचारल्यावर सलमानचा गोंधळ उडाला.
सलमान कोणत्या बॅचला पोलीस झाला असे विचारले असता सलमानने तो २९४ हा बॅच सांगितल्यामुळे पोलिसांना संशय आला. कारण आता पर्यंत राज्यातील १२० पर्यंत बॅच झाल्यामुळे खऱ्या पोलिसांनी काही मिनिटांत खोट्या बोगस सलमानचा पर्दाफाश केला.
त्याची सखोल चौकशी केली असता, या ३१ वर्षीय बोगस पोलिसाचे नाव सलमान मुलाणी असून तो मूळचा पुणे चाकण येथील राहणार आहे. सलमान हा चाकण येथील माणिक चौकातील यशोदिप कॉम्पलेक्समधील चिकन विक्रीचा व्यवसाय करत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.
या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात सलमान याच्याविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांनी भादवी. १७० प्रमाणे ३२५, ५०४ अन्वये सलमान मुलाणी याच्यावर गुन्हा नोंदविला आहे.
विशेष म्हणजे सलमान आणि बारमध्ये मध्ये काम करणाऱ्या तरूणीशी त्याची सोशल मीडियावर ओळख आणि मैत्री झाल्याचे समोर आले आहे. हा प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
हे ही वाचा :
जुन्नर : बिबट्याच्या हल्ल्यात 9 शेळ्यांचा मृत्यू
ब्रेकिंग : व्हाट्सॲपवर निवडणूकीचा प्रचार करणाऱ्यावर मोठी कारवाई
मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या भूमिकेचं डॉ.अमोल कोल्हे यांनी केलं स्वागत!
मध्यरात्री शेकडो विद्यार्थिनींचे कुलगुरूंच्या बंगल्यासमोर 2 तास ठिय्या आंदोलन
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच मतदारसंघात एकूण १८१ पैकी ११० उमेदवारांचे अर्ज वैध
अभिनेता गोविंदा यांचा राजकारणात प्रवेश, ‘या’ पक्षात केला प्रवेश
मोठी बातमी : दिलीप वळसे पाटील यांचा अपघात, खुब्याला मार तर हाथ फ्रॅक्चर