Thursday, November 7, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडखासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी रजनीदेवी पाटील यांचे निधन

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी रजनीदेवी पाटील यांचे निधन


पुणे:दि.१२-सातारा मतदार संघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी रजनीदेवी श्रीनिवास पाटील (वय ७६) यांचे पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज (दि.१२) सायंकाळी सहा वाजता कराड येथील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

रजनीदेवी पाटील या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. सध्या त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू होते. आज दुपारी त्यांची प्रकृती गंभीर बनली होती. दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

रजनीदेवी पाटील यांचा जन्म २६ जुलै १९४८ रोजी झाला. त्यांचे मूळ गाव सातारा तालुक्यातील चिंचणेर वंदन येथील असून चार पिढ्यांची सैनिकी परंपरा असलेल्या बर्गे कुटूंबातील आहे. १६ मे १९६८ रोजी त्यांचा श्रीनिवास पाटील यांच्याशी विवाह झाला.

संबंधित लेख

लोकप्रिय