Thursday, November 7, 2024
HomeNewsनवी सांगवीत पंडीत दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्यात ११०० हून अधिक जणांना...

नवी सांगवीत पंडीत दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्यात ११०० हून अधिक जणांना नोकरी

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर
महाराष्ट्र कौशल्य-रोजगार-उद्योजकता-नाविन्यता विभाग,कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागीय आयुक्तालय,प्रतिभा महिला प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने नवी सांगवी येथील द न्यू मिलेनिअमय इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पंडीत दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याचे आज आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात दिव्यांग बांधवांसाठी विशेष नोंदणी करण्याची सोय केली गेली होती. या रोजगार मेळाव्यात ८ हजार ५०० पदे उपलब्ध होती.पुण्यासह कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील औद्योगिक तसेच इतर सेवा क्षेत्रातील खासगी उद्योगांकडील या नोकऱ्या होत्या.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्री.शेखर सिंह, प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या संस्थापिका सौ.अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन झाले. या मेळाव्यासाठी ६ हजारहून अधिक तरूण-तरूणींनी नोंदणी केली होती. त्यातील ११०० हून अधिक जणांना जागेवरच नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात आले. समाधान देणारी बाब म्हणजे या मेळाव्यात दिव्यांगांसाठीही विशेष नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे ५१ दिव्यांगांना नोकरी उपलब्ध झाली.

यावेळी आमदार मा.सौ.उमा खापरे, माजी मा.सौ.महापौर माई ढोरे,कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागाच्या उपायुक्त सौ.अनुपमा पवार, सहाय्यक आयुक्त सागर मोहिते,माजी उपमहापौर सौ.नानी घुले, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके,भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार,स्थायी समितीचे माजी सभापती राजेंद्र राजापुरे,विलास मडिगेरी, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी नगरसेविका सौ.सविता खुळे, मा.अश्विनी चिंचवडे, सौ.उषा मुंढे, सौ.माधवी राजापुरे, सौ.आरती चोंधे,सौ.शारदा सोनवणे,सौ.निर्मला कुटे, सौ.संगीता भोंडवे, सौ.मनिषा पवार, सौ.वैशाली जवळकर, माजी नगरसेवक हर्षल ढोरे,सांगर आंगोळकर,अंबरनाथ कांबळे,बाबासाहेब त्रिभुवन,शशिकांत कदम,मोरेश्वर शेडगे,राजेंद्र गावडे,सुरेश भोईर,संदिप कस्पटे,विनायक गायकवाड,अभिषेक बारणे,सुरेश चिंचवडे,प्रमोद ताम्हणकर,प्रभाग स्वीकृत सदस्य महेश जगताप,विभीषण चौधरी,संदीप गाडे,गोपाळ माळेकर,भाजप महिला आघाडी शहराध्यक्षा सौ.उज्वला गावडे,भाजपचे प्रदेश सदस्य अमित गोरखे,युवकचे प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे, संकेत चोंधे,योगेश चिंचवडे,विनोद तापकीर,गणेश कस्पटे व पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय