संत कबीर यांचा जन्मकाळ ई स १३९९ मधील असावा. या जगात एक परमेश्वर आहे, असा कबीरांचा असा विश्वास होता, त्यांनी हिंदू आणि इस्लाम या दोन्ही धर्मातील कठोर प्रथांवर टीका केली. प्रत्येक मनुष्याच्या अंतर्मनात मनुष्य जीवनाला सार्थक करणारा गुरु असतो. (Mooralala marwada)
काम, क्रोध, मद, मोह आदी शडरिपु मानवी समाजाचे मोठे नुकसान करतात, मनुष्य जन्म त्यागाचा प्रतीक आहे, भोग आणि विलास यामुळे जीवनातील आनंद नष्ट होतो. असे ते प्रवचनातून सांगायचे. त्यांनी जे काही लिहिले ते कबीराचे दोहे म्हणून भारतीय साहित्यात प्रसिद्ध आहेत. राजस्थानच्या भक्ती संगीतात कबिराच्या दोह्याना खूप महत्व आहे.
मुरालाला मारवाडा हे गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील जनाना गावातील सुप्रसिद्ध एक सुफी लोक गायक आहेत. मारवाडा हा गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील गावातील मेघवाल गायकांची एक जुनी परंपरा आहे.
Mooralala marwada
त्यांनी कबीर, मीराबाई, रविदास आणि इतरांच्या भजन आणि गीतांचे संगीतबद्ध प्रचार आणि प्रसार केला आहे. मूरलाला अब्दुल लतीफ भिट्टाई यांनी विकसित केलेल्या कबीरांच्या गायनाचे राजस्थान आणि कच्छ मधील संगीत लोकधारा उत्सवामध्ये सादरीकरण करून जागतिक स्तरावर कबीराची लोकगीते प्रसारित केली आहेत.
अतिशय मधुर आवाज आणि सुगम संगीतातून मन प्रसन्न करणारे गायक मूरलाला मारवाडा आणि त्यांची टीम संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे.
संकलन – क्रांतीकुमार कडुलकर, पत्रकार, पिंपरी चिंचवड
.