Thursday, December 26, 2024
Homeआंतरराष्ट्रीयकोरोना महामारीमध्ये जगात सर्वात वाईट कामगिरी करणारा नेता म्हणून मोदींना सर्वाधिक मत

कोरोना महामारीमध्ये जगात सर्वात वाईट कामगिरी करणारा नेता म्हणून मोदींना सर्वाधिक मत

मुंबई : जगभरात कोरोनाच्या महामारीने हाहाकार माजवला आहे. भारतामध्ये देखील करोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे. देशातील अनेक ठिकाणी औषधं, ऑक्सिजन बेड्स आणि लसींचा तुटवडा पडत आहे, त्यात पवित्र मानल्या जाणाऱ्या गंगा नदीत कोरोनाचे हजारो मृतदेह आढळल्याने केंद्र सरकार व राज्य सरकारच्या ढीसाळ कारभारावर चोहोबाजूंनी टीका केली जात आहे. अशातच जागतिक पातळीवर घेण्यात आलेल्या एका जनमत चाचणीमध्ये सर्वात वाईट कामगिरी करणारा नेता म्हणून मोदींना ९० टक्के मतं मिळाली आहेत.

अमेरिकेतील “द कॉनव्हर्सेशन” या वेबसाईटने ट्विटरच्या माध्यमातून एक ऑनलाइन जनमत चाचणी घेतलेली होती, यामध्ये करोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झालेल्या चार देशांच्या नेत्यांची नावे लिहून कोरोना महामारीच्या काळात सर्वात वाईट कामगिरी करणारा नेता कोण? असा प्रश्न विचारण्यात आला होता. 

ट्विटरवरील या पोलमध्ये ब्राझीलचे बोल्सोनारो, भारताचे मोदी, मॅक्सिकोचे अ‍ॅमलो आणि अमेरिकेचे ट्रम्प असे चार पर्याय देत या पर्यायांपैकी इतर काही उत्तर असेल तर कमेंट करुन कळवा, असे सांगण्यात आले होते.

त्यानंतर या पोलमध्ये ७५ हजार ४५० जणांनी यात सहभाग घेत आपले मत नोंदवले होते. त्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वाधिक ९० टक्के मतं म्हणजेच ७५ हजार ४५० जणांपैकी ६७ हजार ९०५ जणांनी जगामध्ये कोरोनाची परिस्थिती हातळ्यात मोदी यांनी सर्वात वाईट कामगिरी केल्याचे म्हटले आहे. त्यानंतर दोन नंबरवर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ५ टक्के मत मिळाली तर बोल्सोनारो यांना ३.७ टक्के, मॅक्सिकोच्या अ‍ॅमलो यांना या पोलमध्ये १.३ टक्के मतं मिळाली आहेत.

संबंधित लेख

लोकप्रिय