मावळ / क्रांतीकुमार कडुलकर : एक्सलंट इंडस्ट्रियल इंफ्रा स्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीच्या वतीने ५३ व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह निमित्ताने 7 दिवस सार ट्रांसपोर्ट सिस्टम्स बधालवाडी येथे (मौजे, नवलाख उंब्रे, ता.मावळ) या गावात विविध उपक्रम राबविण्यात आले. (Industrial safty)
प्रमुख पाहुणे एक्सलंट इंडस्ट्रियल इंफ्रास्ट्रक्चर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मल्लिनाथ कलशेट्टी, कुशमन वेकफील्डचे गौरव जोशी, एक्सलन्टचे संचालक मयूर कलशेट्टी, सुरक्षा व्यवस्थापक योगेश दिवेकर आदी कामगार उपस्थित होते.
यावेळी उमाजी सकटे, उल्हास पानसरे, योगेश दिवेकर यांनी सुरक्षाविषयी मार्गदर्शन केले. सर्व प्रथम मयूर कलशेट्टी यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्टीय सुरक्षा शपथ घेण्यात आली. दुसऱ्या दिवशी सर्व स्टाफ आणि कामगारांची सुरक्षा प्रभात फेरी काढून जनजागृती केली. (Industrial safty)
तिसऱ्या दिवशी निरोगी आरोग्यासाठी व्यायामाचे प्रशिक्षण दिले. चौथ्या दिवशी सुरक्षा बेल्टविषयक माहिती, पाचव्या दिवशी आग लागल्यावर कशी विझवावी याचे प्रात्यक्षिके करून दाखवले. सहाव्या दिवशी मास टीबीटी घेण्यात आली. एक्सलंट कंपनीचे एमडी मल्लिनाथ कलशेट्टी, कल्पक इंडस्ट्रीजचे सेफ्टी हेड एमडी मोहम्मद अली यांनी यावेळी मार्गदर्शन केले. सातव्या दिवशी कामगारांसाठी एक्सलंट कंपनीचे राहुल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या.
सप्ताहाच्या सांगता प्रसंगी सुमारे ९० कामगारांसाठी रक्तदाब व आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/IMG-20240316-WA0029-768x1024.jpg)
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सार ट्रान्सपोर्टचे प्रशांत ताम्हणकर, कुशमन वेकफील्डचे गौरव जोशी, वेंकटरमण असोसिएटचे जगदीश डेंगळे, एक्सलंट इंडस्ट्रीजचे एमडी मल्लिनाथ कलशेट्टी, मयूर कलशेट्टी, श्रीशैल कलशेट्टी, योगेश दिवेकर, राहुल मोरे उमाजी सकटे यांनी सुरक्षाविषयक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उल्हास पानसरे यांनी केले.
हा सुरक्षा सप्ताह यशस्वी करण्यासाठी राहुल मधुकर मोरे, तन्मय खंजीरे, वैभव येवले, गौरव भिसे, प्रथमेश दूसे, सर्वेश दूसे,अक्षय मडकर, शंकर डोरगाडे,दीपक यादव, सुनील चरणकर, अभिषेक दसगुडे, रामपाल कुशवाह, अखिलेश श्रीवास्तव,प्रशांत धनगर, विनय कुमार राय, सोमनाथ गव्हाणे, चंदन कुमार,हरिराम भारती, दीपक कुशवाह, प्रणव चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.
हे ही वाचा
अधिसूचना ते मतमोजणी लोकसभा निवडणुकीचे संपुर्ण वेळापत्रक
महाराष्ट्रात ‘या’ तारखांना होणार मतदान, वाचा वेळापत्रक
मोठी बातमी : लोकसभेच्या निवडणूकीची घोषणा, ‘या’ राज्यातही पोटनिवडणुका
महाराष्ट्रात तयार होणार नवीन महामार्ग; माळशेज घाटात तब्बल एवढा मोठा बोगदा
धक्कादायक : बाथरूममध्ये गेला अन् त्याने प्रायव्हेट पार्टला टोचलं इंजेक्शन; पुढे होत्याचे नव्हते झाले