शहीद भगतसिंग यांचा विचार प्रत्येक तरुनांच्या मनात बसवा – काॅ. विनोद गोविंदवार
नांदेड : शहीद भगतसिंग यांची ११३ वी जंयती तोटंबा येथे उत्साहात साजरी करण्यात आली. भारताचा लोकशाही वादी युवा महासंघाच्या वतीने ही जंयती घेण्यात आली. या वेळी मुख्य वक्ते काॅ. विनोद गोविंदवार बोलत होते.
गोविंदवार यांनी भगतसिंग यांच्या विचारावर प्रकाश टाकला, भगतसिंग हयात असतांना असेब्ली मध्ये बाॅम्ब टाकला, कारण तेव्हा त्या ब्रिटिश असेबंलीत कामगार – मंडळ शेतकरी विरोधी कायदा ते काळे इग्रंज करत होते, आता तेच कायदे मोदी सरकार देशाच्या कामगार आणि शेतकरी विरोधात घेते आहेत. भगतसिंगाचे वारस म्हणून येणाऱ्या काळात युवक संघटित होऊन देशविरोधी कायद्याच्या विरोधात उतरतील, असे मत यावेळी विनोद गोविंदवार यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा नेते स्टॅलिन आडे होते. आपल्या अध्यक्षीय समारोपात त्यांना तरुनांना भगतसिंगाच्या विचाराने पेटण्याचे आवहान केले. आणि सामान्य जनतेच्या हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी सज्ज व्हावे, असे मत वक्त केले.