Wednesday, July 3, 2024
Homeताज्या बातम्याManohar Bhide : मनोहर भिडे यांचे देशाचे स्वातंत्र्य आणि महिलांबाबत पुन्हा वादग्रस्त...

Manohar Bhide : मनोहर भिडे यांचे देशाचे स्वातंत्र्य आणि महिलांबाबत पुन्हा वादग्रस्त विधान, नव्या वादाची चिन्हे !

पुणे : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर भिडे (Manohar Bhide) यांनी पुनः एकदा वादग्रस्त विधान केले आहे. वटसावित्रीच्या पूजेला नटीनी आणि ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये, तर फक्त साडी घातलेल्या महिलांनीच जावे असे विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

मनोहर भिडे हे पुण्यात बोलताना म्हणाले की, “वटसावित्रीच्या पूजेला साडी घातलेल्या महिलांनीच जावे. ड्रेस घातलेल्या महिलांनी पूजेला जाऊ नये.” भिडे यांच्या या वक्तव्याने महिलांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. त्यांनी पुढे म्हंटले की, “वारकरी आणि धारकरी संगम हा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. रायगडावर सुवर्ण सिंहासन करायचे आहे. गोमाता, भारतमाता, वेदमाता सारख्या सात मातांच्या संरक्षणासाठी वाटेल ते करायला तयार असणे म्हणजे हिंदवी स्वराज्य व्रत आहे.”

पुण्यात पालखी सोहळ्याच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी देशाच्या स्वातंत्र्याबाबतही वादग्रस्त विधान केले आहे. आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य हांडगं, दळभद्री स्वातंत्र्य आहे असंही वक्तव्य भीडे यांनी केल आहे. हिंदवी स्वराज्य हे खरं स्वातंत्र्य असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. (Manohar Bhide)

संत तुकाराम महाराज तसंच संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं पुणे शहरात आगमन झालं. दरवर्षी या पालखी सोहळ्यात संभाजी भिडे असंख्य कार्यकर्त्यांसह सहभागी होतात. याच पार्श्वभूमीवर संभाजी भिडे पुण्यात आले. त्यानंतर संभाजी भिडे यांनी स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं.

Manohar Bhide

मनोहर भिडे यांच्या या विधानांमुळे समाजात विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. विशेषतः महिलांनी त्यांच्या वटसावित्री पूजेबाबतच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी त्यांच्या विधानांचा निषेध केला असून या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

धक्कादायक : लिफ्टमध्ये कुत्र्याला वॉकरने मारहाण; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद

धक्कादायक ! 19 वर्षीय तरुणाचा झोपेत चालताना सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू!

मोठी बातमी : राज्यातील गट ‘क’ पदांच्या सर्व परीक्षा आता एमपीएसीद्वारे

मोठी बातमी : आजपासून नवे फौजदारी कायदे लागू, वाचा काय होणार बदल !

IDBI : आयडीबीआय बँक अंतर्गत मोठी भरती; आजच करा अर्ज!

ब्रेकिंग : जुलैच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात

नवीन फौजदारी कायद्यांमुळे न्यायव्यवस्थेतील अनुशेष कमी होण्यास मदत होईल – राज्यपाल रमेश बैस

मोठी बातमी : भुशी धरणात एकाच कुटुंबातील ५ जणांचा बुडून मृत्यू, धक्कादायक Video व्हायरल

मोठी बातमी : राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती, वाचा कोण आहेत सुजाता सौनिक ?

‘माझी लाडकी बहीण योजना’ महिलांना मिळणार महिना 1500 रूपये; ‘अशी’ आहे अर्ज प्रक्रिया!

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय