Friday, December 27, 2024
Homeग्रामीणमंचर : सहा महिन्यांपासून फरार असलेला वेशांतर करून हूल देणारा कुख्यात खंडणी...

मंचर : सहा महिन्यांपासून फरार असलेला वेशांतर करून हूल देणारा कुख्यात खंडणी गुन्हेगार अखेर जेरबंद

जुन्नर / आनंदा कांबळे : मंचर पोलिस स्टेशनच्या हद्दीत लोकांकडून पैशाची मागणी करून त्यांच्याकडून खंडणी घेतल्याबाबत मंचर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल होते. या गुन्ह्यातील आरोपी हरीश महादू कानसकर, रा. रांजणी, ता. आंबेगाव, जि. पुणे हा गुन्हे केले पासून फरार होता. पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी विशेष पथक नेमून सदर गुन्ह्यातील आरोपी हरीश कानसकर याचा शोध घेण्याबाबत योग्य त्या मार्गदर्शक सूचना केल्या होत्या. 

या गुन्ह्यातील आरोपीचा शोध चालू असताना पद्माकर घनवट यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी हरीश कानसकर हा दातिवली दिवा मुंबई या ठिकाणी राहत असल्याची माहिती मिळाल्याने नेताजी गंधारे यांनी टिमसह जावून संशयित इसमास ताब्यात घेतले असता त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव हरीश महादू कानसकर, सद्या रा. दातिवली, दिवा, मुंबई मुळ रा. रांजणी, ता. आंबेगाव, जि. पुणे असे असल्याचे सांगितले.

या बाबत मुंब्रा पोलीस स्टेशन येथे माहिती देऊन त्यास ताब्यात घेऊन त्याची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास कामी मंचर पोलिस स्टेशनचे ताब्यात दिले आहे.

पुढील कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील,  उपविभागीय पोलीस अधीकारी लंभाते यांच्या मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट नेताजी गंधारे, पो.हवा. दिपक साबळे, पो.हवा. हनुमंत पासलकर, पो.हवा. विक्रम तापकिर, पो.हवा. गायकवाड, पो.ना. संदिप वारे, पो.कॉ. अक्षय नवले, पो.कॉ. निलेश सुपेकर, पो.कॉ. अक्षय जावळे यांनी केली आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय