आळंदी / अर्जुन मेदनकर : येथील इंद्रायणी नदी घाटावरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या रक्षा विसर्जन स्थळ स्मारक येथे परिसर स्वच्छ करीत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी विनम्र अभिवादन करून साजरी करण्यात आली.
यावेळी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या स्मारकास गुलाब पुष्प वाहून आदरांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या पुष्पाताई कुऱ्हाडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष नंदकुमार वडगावकर, संदीप नाईकरे, अर्जुन मेदनकर, ज्ञानेश्वर घुंडरे, भागवत काटकर, दिनेश कुऱ्हाडे, विठ्ठल शिंदे आदी उपस्थित होते.