पुणे : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (कात्रज डेअरी) दूधाच्या खरेदी आणि विक्री दरात दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. १ फेब्रुवारीपासून गायीच्या दूधाच्या खरेदी दरात प्रति लिटर दोन रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. संघाच्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
१ फेब्रुवारीपासून गायीच्या दूधाचा ३.५ फॅट व ८.५ एसएनएफसाठी खरेदी दर संस्थांसाठी वरकड खर्चासहित प्रतिलिटर ३७ रुपये ८० पैसे राहील. दूध खरेदी दरात वाढ करण्यात आल्याने दूधाच्या विक्री दरात देखील वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता कात्रज डेअरीच्या दुधाचे दर हे टोण्ड, डबल टोण्ड, प्रमाणित व मलई दूधाचे दरात प्रतिलिटर दोन रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे.