Monday, February 17, 2025

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धत कोल्हापूरचा पैलवान पृथ्वीराज पाटीलची बाजी !

सातारा : महाराष्ट्रातील प्रतिष्ठेची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा साताऱ्यात पार पडली. महाराष्ट्राच्या रांगड्या मातीतील प्रतिष्ठेची महाराष्ट्र केसरी स्पर्धेची अंतिम फेरी कुस्ती रसिकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारी ठरली. अत्यंत अटीतटीची व चुरशीच्या झालेल्या सामन्यात कोल्हापूरचा पैलवान पृथ्वीराज पाटील याने ५-४ गुणांच्या फरकाने मुंबई पश्चिमचे नेतृत्त्व करणाऱ्या व मूळचा सोलापूरचा असलेल्या विशाल बनकरला चीतपट करून मानाची गदा जिंकली. 

संतापजनक ! भाजप आमदाराच्या विरोधात बातम्या दिल्या म्हणून पत्रकारांना पोलिसांकडून नग्न करून मारहाण

साताऱ्यातील जिल्हा क्रीडा संकुलात ६४ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा निकाल लागला आहे. अंतिम लढतीत महाराष्ट्र केसरीची गदा कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलने उचलली. तो प्रदार्पणातच महाराष्ट्र केसरी ठरला. त्याने अंतिम लढतीत मुंबईच्या विशाल बनकरला मात दिली. 

मोठी बातमी : गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस कोठडी, तर कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी

विशेष म्हणजे कुस्तीचे माहेरघर म्हटल्या जाणाऱ्या कोल्हापुरला तब्बल २१ वर्षानंतर महाराष्ट्र केसरीची मानाची गदा मिळाली आहे. याआधी विनोद चौगुले यांनी महाराष्ट्र केसरीची गदा कोल्हापूरला मिळवून दिली होती.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles