LPG Cylinder : देशात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरू आहे. अशात सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एलपीजी सिलिंडरच्या दरात आजपासून बदल करण्यात आले आहेत. एलपीजी सिलिंडरचे दर १९ रुपयांनी कमी झाले आहेत. तेल विपणन कंपन्यांनी महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली आहे.
अनेकांचं लक्ष लोकसभा निवडणुकीकडे लागले असताना आता गॅसच्या किंमतीबाबत एक माहिती समोर आलीये. त्यानुसार, एलपीजी सिलिंडर आजपासून १९ रुपयांनी स्वस्त झाला आहे. हे बदल केवळ व्यावसायिक सिलिंडरच्या दरात झाले आहेत.तेल कंपन्यांनी १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरच्या (LPG Cylinder) किमतीत कोणताही बदल केलेला नाही. मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर शहरात घरगुती सिलिंडरचे दर जैसे थे आहेत.
घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीतील दरात 9 मार्च रोजी 200 रूपयांनी घट झाली. एप्रिल महिन्यामध्ये व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या (LPG Cylinder) किंमतीत घट झाली होती. याचा ग्राहकांना दिलासा मिळाला.
देशाची अर्थिक राजधानी दिल्ली, मुंबई आणि चेन्नई येथे व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत 19 रूपये दरात घसरण दिसून आली. या तिन्ही महानगरामध्ये 1745.50 रुपये, 1698.50 रुपये आणि 1911 प्रति गॅस सिलेंडर दर झाला. तर कोलकता येथे गॅस सिलेंडरचा भाव हा 20 रूपयांनी कमी झाला. यापूर्वी १ एप्रिल रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ३० रुपयांची कपात करण्यात आली होती. मात्र घरगुती सिलिंडरच्या किमतीत कोणताच बदल करण्यात आलेला नाही.
हे ही वाचा :
ब्रेकिंग : अभिनेता सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील आरोपीची आत्महत्या
ब्रेकिंग : कोरोना लसीचे प्रकरण सर्वोच्च न्यायलायात, बाधितांना भरपाई देण्याची मागणी
मोठी बातमी : माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
सर्वात मोठी बातमी : 100 हून अधिक शाळांत बॉम्ब ठेवल्याची धमकी, एकच खळबळ
संपत्तीसाठी लालची मुलाने बापाला बेदम मारले, व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद
WhatsApp वर बिना इंटरनेट पाठविता येणार फाइल्स
IIIT : इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नागपूर येथे विविध पदांची भरती
AIIMS : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अंतर्गत भरती
अमित शहांचे हेलिकॉप्टर जोरदार वाऱ्यामुळे डगमगले, मोठी दुर्घटना टळली
निवडणूक प्रचारात कोल्हे आढळराव आमनेसामने !
ब्रेकिंग : अमोल कोल्हे यांची डोकेदुखी वाढली, आणखी एका उमेदवाराला तुतारी चिन्ह
ब्रेकिंग : वसंत मोरे यांना निवडणूक आयोगाकडून निवडणूक चिन्ह बहाल
केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई अंतर्गत भरती; आजच करा!
NCTE : राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती