Loksabha : देशात आणि राज्यात सध्या लोकसभेची (Loksabha) रणधुमाळी सुरू आहे. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीत लढत होणार आहेत. मात्र, जागा वाटपावरून प्रादेशिक पक्षही “एकला चलो” चा मार्ग स्विकारण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. अशातच भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI) ने परभणी लोकसभा (Loksabha) मतदारसंघातून आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे.
सातत्याने परभणी व जालना जिल्ह्य़ातील जनतेच्या हक्कासाठी लढा देणारे, अशी ओळख राजन क्षीरसागर यांची असून 2019 मध्ये देखील त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून निवडणूक लढवली होती.
राजन क्षीरसागर यांचा मंगळवारी (दि.२, एप्रिल) रोजी परभणी येथील शनिवार बाजार मैदानातून मिरवणूकीने अर्ज दाखल केला जाणार आहे. यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. भालचंद्र कांगो, राज्य सरचिटणीस कॉ. सुभाष लांडे यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत.
फुटीचा सत्ताधाऱ्यांना फटका बसण्याची शक्यता!
शिवसेना भाजप युती असताना परभणी मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. या निवडणुकीत मात्र शिवसेनेत झालेल्या फुटीचा परिणाम आगामी निवडणुकीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


हे ही वाचा :
CPIM: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली जाहीर केली 44 उमेदवारांची घोषणा
मैत्रिणीवर छाप टाकण्यासाठी बनला बोगस पोलिस, पुढे काय झाले वाचा !
मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर
ब्रेकिंग : आंबेडकर कुटूंबातील मोठा चेहरा अमरावतीत नवनीत राणांच्या विरोधात लढणार
बिहारमध्ये इंडिया आघाडीचे जागावाटप निश्चित; राजद, कॉंग्रेस, डाव्यांना “इतक्या” जागा
ब्रेकिंग : व्हाट्सॲपवर निवडणूकीचा प्रचार करणाऱ्यावर मोठी कारवाई
मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या भूमिकेचं डॉ.अमोल कोल्हे यांनी केलं स्वागत!
मध्यरात्री शेकडो विद्यार्थिनींचे कुलगुरूंच्या बंगल्यासमोर 2 तास ठिय्या आंदोलन
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच मतदारसंघात एकूण १८१ पैकी ११० उमेदवारांचे अर्ज वैध
अभिनेता गोविंदा यांचा राजकारणात प्रवेश, ‘या’ पक्षात केला प्रवेश