Sunday, January 5, 2025
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : लायन्स क्लब ऑफ़ पिंपळे सौदागर अ‍ॅक्टिव्ह अध्यक्षा लॉयन प्रीती बोंडे...

PCMC : लायन्स क्लब ऑफ़ पिंपळे सौदागर अ‍ॅक्टिव्ह अध्यक्षा लॉयन प्रीती बोंडे यांच्या अध्यक्षतेखाली रक्तदान शिबीर

रक्तदात्यास 5 लाखाचा आरोग्य विमा

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : लॉयन्स क्लब ऑफ पिंपळे सौदागर ऍक्टिव्ह टीमच्या वतीनेज्ञपिंपळे सौदागर स्पार्कल 24, सलोन, बँक ऑफ महाराष्ट्र जवळ, कुणाल आयकॉन रोड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग घेतला, प्रत्येक रक्तदात्यास पाच लाखाचा हेल्थ इन्शुरन्स सुद्धा देण्यात आला.

आपल्या रक्तदानाने  कोणाचे तरी आपण प्राण वाचवू शकतो. शहरातील गरजू रुग्णांना मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज आहे. रक्तदान शिबिरातून माणुसकीचे नाते शिबिरातून वृद्धिंगत होते, शहरात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे मोठ्या प्रमाणात आम्ही आयोजित करणार आहोत असे क्लबच्या अध्यक्षा लॉयन प्रिती बोंडे यांनी सांगितले.

या शिबिरामध्ये अध्यक्ष लायन प्रिती बोंडे,ब्लड डोनेशनचे डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन डॉक्टर हेमंत अग्रवाल सर यांनी शिबिरार्थीना पाच लाखाचा आरोग्य विमा व प्रशस्तीपत्र प्रदान केले.

लॉयन बालाजी जगताप, लॉयन जयंत बोंडे, लॉयन MJF सुनील जाधव, लॉयन दीपक सोनार, लॉयन MJF ऋषिकेश देवरे, धनंजय माने, लॉयन जितेंद्र हिंगणे, गुलशन नायकुडे, लॉयन भाग्यश्री कटारिया, अंजुम सय्यद, रुपाली शुक्ला व इतर लॉयन्स सभासद यावेळी उपस्थित होते.

लॉयन गुलशन नायकुडे यांनी शिबिराचे आयोजन केले.

संबंधित लेख

लोकप्रिय