Saturday, December 21, 2024
Homeराज्यलता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा ; सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा ; सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

Photo : Facebook


मुंबई दि. ६ : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज मुंबईत निधन झाले, त्याच्या निधनाने राज्यासह देशभरात शोककळा पसरली आहे. त्याच्या निधनाने केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहिर केला आहे तर राज्य सरकारने दुखवटा म्हणून राज्यात सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध अधिकारी पदांच्या ५०० जागांसाठी भरती

राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आज रविवार दि ६ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ ( सन १९८१ चा अधिनियम २६) च्या कलम २५ खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.

10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर ! परिक्षेच्या सरावासाठी मिळणार Question Bank !

गुंतवणूकदारांसाठी खुशखबर ! पोस्ट ऑफीसात अवघ्या १०० रुपयांत आरडी सुरु करा आणि मिळवा आकर्षक परतावा

संबंधित लेख

लोकप्रिय