Friday, November 22, 2024
Homeजिल्हाKolhapur : पोलिस असल्याची बतावणी करणाऱ्याला वाहतूक शाखेची चपराक

Kolhapur : पोलिस असल्याची बतावणी करणाऱ्याला वाहतूक शाखेची चपराक

kolhapur/ यश रुकडीकर : दि.२६ रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान व्हिनस कॉर्नर कडून दाभोळकर कॉर्नर चौकाकडे जाणाऱ्या MH 09GQ7010 या दुचाकीवरील वाहनस्वाराला वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार अमर उबाळे यांनी थांबवले. त्याच्याकडे चौकशी करत असताना त्याने आपले नाव किरण कांबळे असे सांगितले. तसेच मी इचकरंजीतील वाहतूक शाखेत पोलीस असल्याचे माहिती दिली. kolhapur News

त्याच्याकडे ओळखपत्राची मागणी केली असता त्याने ओळखपत्र घरी विसरून आल्याचे सांगितले.पो. कॉ उबाळे यांना त्या वाहनचालकावर संशय आल्याने त्यांनी पोलीस निरीक्षकांशी संपर्क साधून त्या इसमाला शाहूपुरी पोलिस ठाणे येथे हजर केले.

चौकशीच्या दरम्यान तो इसम पोलीस असल्याची बतावणी करत असल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्याची खरे नाव विनोद भास्कर कांबळे, वय ३८, रा.अतिग्रे ता. हातकणंगले असे असल्याची माहिती मिळाली. त्याच्या विरुद्ध पो. कॉ.अमर उबाळे यांनी यांनी फिर्याद दिली असून सदर इसमाविरुद्ध भा. दं. वि.सं कलम ४१७ व १७० प्रमाणे शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पो. कॉ.९६० अमर उबाळे यांनी अत्यंत सतर्कपणे ही कारवाई केलेली आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : खासदार नवनीत राणा यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश

मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीला मोठा धक्का, वंचितने जाहीर केले आपले उमेदवार

मोठी बातमी : निवडणूक आयोगाला न्यायालयाचा मोठा दणका, अखेर ती निवडणूक रद्द

हार्दिक पांड्याने असे काही केले की, पांड्यावर लोक भडकले

शाहरूख खानच्या ‘त्या’ कृतीमुळे लोकांचा संताप

JNU : ‘जेएनयू’ विद्यार्थी संघाच्या निवडणूकीत डाव्यांचा दणदणीत विजय तर भाजप संलग्न अभाविपचा सुपडा साफ

संबंधित लेख

लोकप्रिय