पिंपरी चिंचवड – स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दापोडी या शाळेतील सन १९८९ साला मधील दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या एक जून च्या वाढदिवसानिमित्ताने जुन्या मित्रांच्या परत एकदा वर्ग भरला होता. एकूण 22 मित्र या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. (PCMC)
काही मित्र सेवानिवृत्तीनंतर आपले आयुष्य सुखा समाधान जगत असताना मैत्रीचा ओलावा निर्माण करण्यासाठी या सभेमध्ये उपस्थित होते असे म्हणतात की शाळेतील मैत्री ही एकदम घट्ट व प्रेरणादायी असते. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता की एकमेकाची खुशाली जाणून घेणे सुखदुःख जाणून घेणे व गप्पा गोष्टी हास्यविनोद याच्या द्वारे जुन्या आठवणींना उजाळा देणे. यावेळी एकूण 11 जणांचे वाढदिवस साजरे करण्यात आले.
टोपी श्रीफळ व शाल देऊन मित्रांचे अभिष्टचिंतन केले व यानंतर केक कापला. यानंतर सँडविच गरम गरम भजी व चहाचा आस्वाद घेतला सर्व मित्र एकत्र भेटल्याने काहींनी शाळेच्या आठवणींना उजाळा दिला तर एकमेकांच्या फिरक्या घेतल्या. (PCMC)
कार्यक्रमाची प्रस्तावना रमेश मुसूडगे यांनी केली तर गौतम डोळस, पांडुरंग भोरे यांनी आपले विचार मांडले या नंतर सर्वांनी महिन्यातून किमान एकदा तरी एकत्र येऊन मनसोक्त्याच्या गप्पागोष्टी कराव्यात आपली सुखदुःख सांगून आपली मन मोकळे करावे असे ठरवण्यात आले.
श्री राजेंद्र काटे यांनी सर्वांचे आभार मानले आणि सर्व मित्र एक मोठा आनंद घेऊन आपल्या घराकडे परतले.
---Advertisement---
---Advertisement---
PCMC : पन्नास वर्षानंतर भरला शाळेचा वर्ग
---Advertisement---
- Advertisement -