Saturday, October 12, 2024
HomeकृषीKisan Sabha: बाळहिरड्याच्या हमीभावसाठी नाशिक येथे किसान सभेची बैठक

Kisan Sabha: बाळहिरड्याच्या हमीभावसाठी नाशिक येथे किसान सभेची बैठक

Kisan Sabha : शेतकरी हित लक्षात घेऊन बाळहिरड्याला योग्य तो हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी किसान सभेच्या (Kisan Sabha) वतीने आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, नाशिक यांच्याकडे करण्यात आली. Kisan Sabha’s demand to announce guarantee price for Balhirda

आंबेगाव, जुन्नर, खेड व अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील, प्रमुख उपजीविकेचे साधन म्हणजे बाळहिरडा होय. मागील पाच ते सात वर्षांपासून शासकीय पातळीवरील बाळहिरडा खरेदी थांबवलेली होती. योग्य हमीभाव देऊन ही खरेदी पुन्हा सुरू व्हावी यासाठी मागील तीन वर्ष किसान सभा सातत्याने लोकशाही मार्गाने लढत आहे.

या लढ्याचा परिणाम म्हणजे, आदिवासी विकास महामंडळ यांनी बाळहिरडा खरेदी सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. व खरेदीचा हंगाम सुरु करण्याअगोदर फेब्रुवारी महिना अखेर, बाळहिरड्यास योग्य असा हमीभाव जाहीर करू असे लेखी आश्वासन किसान सभेला आदिवासी विकास महामंडळ, नाशिक यांचे कार्यालयाच्या वतीने देण्यात आले होते.

त्यानुसार बाळहिरड्याचा योग्य असा हमीभाव त्वरित जाहीर करावा यासाठी किसानसभेच्या शिष्टमंडळाने नुकतीच आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्रीमती लीना बनसोड यांची नाशिक येथे भेट घेतली.

यावेळी किसान सभेला दिलेल्या लेखी आश्वासनाची पूर्तता लवकर व्हावी व आदिवासी लोकांचे प्रमुख उत्पनाचे साधन हे बाळहिरडा असल्याने त्याला योग्य असा हमीभाव द्यावा अशी मागणी किसान सभेच्या वतीने यावेळी करण्यात आली.

या सर्व पार्श्वभूमीवर व्यवस्थापकीय संचालक, आदिवासी विकास महामंडळ यांनी या आठवड्यातच बाळहिरडयाचा हमीभाव आम्ही जाहीर करू असे नमूद केले.

याबरोबरच, हिरड्याला जो हमीभाव जाहीर केला जाईल. त्याच्यापेक्षा कमी दरात हिरड्याची खरेदी महामंडळ करणार नाही. उलट बाजारात हिरड्याचे दर वाढले तर त्याचा आढावा घेऊन हमीभावापेक्षा जास्त दर दिला जाईल असे ही त्यांनी यावेळी आश्वासित केले.

एप्रिल 2024 पासून, पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, खेड, व नगर जिल्ह्यातील अकोले येथे हिरडा खरेदी केंद्र, कुठे – कुठे असतील याविषयीं चर्चा झाली. त्याचबरोबर बाळहिरड्याच्या काढणी वेळी जे अपघात होतात व अनेक वेळा मृत्यू ही होतात. या पार्श्वभूमीवर हिरडा उत्पादक शेतकऱ्यांना विम्याचे संरक्षण कसे देता येईल याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे आदिवासी विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक जयराम राठोड यांनी नमूद केले.

या बैठकीला, आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती लीना बनसोड आणि सर्व आदिवासी विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, किसान सभेचे डॉ. अमोल वाघमारे, अशोक पेकारी, लक्ष्मण जोशी, गनपत घोडे, प्रा. ज्ञानेश्वर सावळे, रामदास लोहकरे, दत्ता गिरंगे, राजू शेळके इ. उपस्थित होते.

whatsapp link

हे ही वाचा :

Indian Bank : इंडियन बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती

CBSE : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

ब्रेकिंग : सीएनजीच्या दरात मोठी कपात, सर्वसामान्यांना दिलासादायक

सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ, आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडले.

ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांविरूद्ध १८६५ तक्रारी प्राप्त; ७३९ परवाने निलंबित, वाचा काय प्रकरण

संबंधित लेख

लोकप्रिय