खेड : आदिवासी क्रांतिकारकांचा भव्य जयंती सोहळा रविवार दिनांक 12 डिसेंबर 2021 या दिवशी नायफड गावांमध्ये आदिवासी युवा मंच नायफड च्या कार्यकर्त्यांनी समाजाच्या प्रबोधनासाठी भगवान बिरसा मुंडा व आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे या आदिवासी थोर क्रांतिकारकांचा संयुक्तिक रित्या जयंती सोहळा पार पाडला.
या कार्यक्रमाच्या वेळी आदिवासी युवा मंचने समाजासाठी काम करणाऱ्या आदिवासी समाजाच्या वेगवेगळ्या संघटनेचे आदिवासी समाजासाठी काम करणारे कार्यकर्ते या सर्वांना निमंत्रित केले होते.
यामध्ये बिरसा ब्रिगेड सह्याद्री, अखिल भारतीय किसान सभा पुणे, तसेच आदिवासी विचार मंच, बिरसा क्रांती दल व ट्रायबल फोरम या सर्व संघटनांना एकत्रित आमंत्रित करून सामाजिक ऐक्य घडवून आणण्याचा प्रयत्न व त्यांच्याकडे असलेल्या सामाजिक आणि सांस्कृतिक ज्ञानाचा वापर करून ते ज्ञान आपल्या कार्यक्रमातून आदिवासी समाजातील तळागाळातील जे लोक आहेत त्यामध्ये ठाकर, कातकरी, कोळी महादेव या लोकांपर्यंत ते ज्ञान पोहोचवण्याचं काम आदिवासी युवा मंचने या कार्यक्रमा मार्फत केले.
सदर कार्यक्रमाची सुरुवात ढोल लेझीम पथक नायफड यांच्या रॅलीने झाली. त्याच्यानंतर मुक्तादेवी बाल भजन मंडळ यांनी आदिवासी पद्धतीने भजन करून लोकांना प्रभावित केले.
नायफड गावातील काळात काम करणाऱ्या योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच आदिम प्रबोधन पथक दिघी पुणे, यांनी आपल्या गायनाच्या कार्यक्रमामधून प्रबोधन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक प्रा. विष्णू शेळके म्हणाले, “आदिवासी समाजाला भविष्यामध्ये जर आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर त्यांना स्वतंत्र राजकीय अस्तित्व असणे गरजेचे आहे. यासंदर्भात त्यांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलं व सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये आदिवासींची किती दयनीय अवस्था आहे हेही त्यांनी पटवून दिले.”
या कार्यक्रमाचे नियोजन आदिवासी युवा मंचचे निलेश तिटकारे, विकास भाईक, सुदर्शन तिटकारे, ग्रा. पं. सदस्य सुनिल मिलखे, ग्रा.पं. सदस्य रोहिदास भाईक, पंढरीनाथ भाईक, करण भाईक, रामदास ठोकळ, भगवान काठे, एकनाथ डवने, ओमकार फलके, यांच्यासह गावातील सर्व ग्रामस्थ तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.