नवी मुंबई : कल्याणमधील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्येच्या गंभीर आरोपाखाली अटकेत असलेला मुख्य आरोपी विशाल गवळी (Vishal Gawali) याने तळोजा कारागृहात आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी (12 एप्रिल 2025) पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास कारागृहातील शौचालयात गवळीने गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याची माहिती पोलिसांनी दिली. (हेही वाचा – महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याला एका झाडाने रात्रीतून केले करोडपती)
विशाल गवळी (वय 35) याच्यावर 23 डिसेंबर 2024 रोजी कल्याणमधील चक्की नाका परिसरातून 13 वर्षीय मुलीचे अपहरण, बलात्कार आणि हत्या केल्याचा आरोप होता. त्याची तिसरी पत्नी साक्षी गवळी हिच्यासह त्याने हा गुन्हा केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, विशालने मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिची हत्या करून मृतदेह एका बॅगेत भरला आणि साक्षीच्या मदतीने तो कल्याण-पडघा रस्त्यावरील बापगाव येथे टाकून दिला. 24 डिसेंबर रोजी मृतदेह सापडल्यानंतर साक्षीला त्याच रात्री अटक करण्यात आली, तर विशाल 25 डिसेंबर रोजी बुलढाणा येथील शेगाव येथून पकडला गेला. (हेही वाचा – UPI Down : GPay, PhonePe, Paytm ची सेवा ठप्प; वापरकर्ते हैराण)
विशाल आणि साक्षी यांना विशेष पोक्सो न्यायालयाने 2 जानेवारी 2025 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आले होते. शनिवारी पहाटे कारागृहातील नियमित तपासणीदरम्यान गवळी शौचालयात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. कारागृह प्रशासनाने तातडीने पोलिसांना याची माहिती दिली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. (हेही वाचा – बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालाचे वेध ; वाचा काय आहेत नवीन अपडेट)
पोलिस आणि कारागृह प्रशासनाची प्रतिक्रिया | Vishal Gawali
तळोजा कारागृहाचे अधीक्षक विजयकुमार बनसोड यांनी सांगितले की, “पहाटे 3:30 वाजता ही घटना घडली. गवळीने शौचालयात गळफास घेतला. याची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांनी त्याला खाली उतरवले, पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.” त्यांनी पुढे नमूद केले की, या प्रकरणाची चौकशी सुरू असून, कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. (हेही वाचा – पाकिस्तानमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के; रिश्टर स्केलवर 5.8 तीव्रतेची नोंद)